Thursday, 21 January 2016

पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय योजना

पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय योजना  
  • शासनाच्या विविध घरकुल लाभाच्या योजनांअंतर्गत प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी स्वतःच्या मालकीची जागा असणे आवश्यक आहे. अशावेळी स्वतःची जागा नसलेल्या दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना जागा खरेदीसाठी अर्थसहाय्य करण्याकरीता राज्य शासनाने पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना सुरु केली आहे. 
  • दारिद्र्यरेषेखालील घरकुल पात्र परंतु घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या लाभधारकांना लागू राहील.
  • केंद्र पुरस्कृत इंदिरा आवास योजनेतील दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन कुटुंबांना जागा खरेदी करण्यासाठी केंद्र शासनामार्फत १० हजार व योजनेअंतर्गत रुपये ४० हजार असे एकूण ५० हजारापर्यंत अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
  • रमाई आवास योजना व शबरी आवास योजना या राज्य पुरस्कृत घरकुल योजनेतील दारिद्र्यरेषेखालील घरकुल पात्र भूमिहीन कुटुंबांना जागा खरेदी करण्यासाठी या योजनेअंतर्गत ५० हजारापर्यंत अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यात येईल. ही योजना दारिद्र्यरेषेवरील लाभधारकांसाठी लागू राहणार नाही.



‘उन्नत महाराष्ट्र अभियान’ योजना

 ‘उन्नत महाराष्ट्र अभियान’ योजना

  • देशातील ग्रामीण क्षेत्रातील विकासकामांमध्ये आय.आय.टी.सारख्या प्रगत शैक्षणिक संस्थांचा सहभाग वाढवून परिवर्तन घडविण्यासाठी केंद्र शासनामार्फत ‘उन्नत भारत अभियान’ देशातील निवडक, प्रगत शैक्षणिक संस्थांमार्फत राबविण्यात येत आहे.
  • याच धर्तीवर राज्यातील उच्च व तंत्र शिक्षण संस्थांच्या मदतीने विविध सामाजिक व विकासाच्या दैनंदिन जीवनातील समस्यांची उकल करुन त्यावर तोडगा काढण्याच्या हेतूने दर्जेदार शैक्षणिक संस्था, विविध शासकीय यंत्रणा (जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा विकास आणि नियोजन विकास यंत्रणा इ.) यांच्यादरम्यान परस्पर समन्वय सहकार्य व वृद्धिंगत करणे. 
  • त्याद्वारे संशोधनाच्या माध्यमातून विविध योजनांच्या अंमलबजावणीच्या प्रकियेला नवीन स्वरुप देऊन स्थानिक पातळीवरील विकासाच्या प्रश्नांवर तंत्रज्ञानाचा वापर करुन उपाय शोधण्यासाठी ‘उन्नत महाराष्ट्र अभियान’ योजना राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

अभियानाची उद्दिष्टे-
  • स्थानिक पातळीवरील समस्यांची उचित तंत्रज्ञानाचा वापर करुन उकल करणे. तसेच संशोधनाद्वारे विकासासाठी चालना देण्यासाठी आणि या क्षेत्रात कार्यरत विविध शासकीय यंत्रणांची मदत उपलब्ध होण्यासाठी व्यासपीठ निर्माण करणे
  • उच्च व तंत्र शिक्षण संस्थांतील अभ्यासक्रम आणि संशोधन स्थानिक पातळीवरील विकास योजना / समस्यांशी एकरेखित (Align) करणे व त्यांची सांगड घालणे.
  • निवड केलेल्या संस्थांमध्ये त्या-त्या परिसरातील समाजाच्या विकासविषयक समस्यांवर संशोधन करण्यासाठी तंत्रज्ञान आणि विकास कक्ष स्थापित करणे. राज्यस्तरावर या संशोधनाच्या अनुषंगाने माहिती-कोष तयार करुन तो सामान्य नागरिकांना सुलभ होईल, अशा पद्धतीने जतन करणे.



MPSC Insights QUIZ 8

1.    भारताचे कौशल्य विकास मंत्री कोण आहेत ?
A. राजीव प्रताप रुडी
B. निर्मला सत्यनारायण
C. रवि प्रसाद शंकर
D. मनोहर पर्रीकर
2.    शिपिंग मंत्रालयाने " ग्रीन बंदरे प्रकल्प " सुरू केला आहे. हा प्रकल्प मोदी सरकारने सुरू केलेल्या खालील कोणत्या योजनेला मदत करेल?
A. स्किल इंडिया
B. स्मार्ट  सिटी मिशन
C. स्वच्छ भारत
D. मेक इन इंडिया
3.    १९ वी  ई-गव्हर्नन्स राष्ट्रीय परिषद खालील कुठल्या ठिकाणी कोणत्या आयोजित होईल?
A. पुणे
B.नागपूर
C.मुंबई
D. दिल्ली
4.    कुठले राज्य  भारतातील पहिले सेंद्रीय शेती राज्य म्हणून घोषित करण्यात आले?
A. केरळ 
B. सिक्कीम
C. गोवा
D. तेलंगाना
5.    कोणत्या देशाने नुकतीच आर्थिक आणीबाणी घोषित केली आहे?
A. जर्मनी
B. इटली
C. स्पेन
D. फ्रांस
6.    कोणत्या बहुपक्षीय संघटनेद्वारे जागतिक पर्यटन बॅरोमीटर या नावाने अहवाल जाहीर केला जातो?
A.  World Bank
B.  UNWTO
C. International Monetary Fund
D. World Economic Forum
7.    कोणत्या युरोपियन शहरात वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ४६ व्या वार्षिक सभेला २० जानेवारी २०१६ रोजी सुरुवात झाली?
A . लंडन
B . बर्लिन
C . डावोस
D . पॅरिस
8.    नासा या संस्थेनुसार पहिल्यांदाच अंतराळात वाढलेल्या फुलाचे नाव काय आहे?
A . झीन्निया (Zinnia)
B . गुलाब
C . पेओनि (Peony)
D .  ईरीस (Iris)
9.    खालील पैकी ट्विटरवर दुसरा क्रमांक असलेले (followers) भारतीय कोण आहेत?
A. आमीर खान
B. अमिताभ बच्चन
C. शाहरुख खान
D. नरेंद्र मोदी
Write your answers in comment section.... 
Answers will be provided in coming days

Team MPSC Insights