Tuesday, 17 November 2015

क्रांतिकारक विष्णु गणेश पिंगळे बलिदान शताब्दी

क्रांतिकारक विष्णु गणेश पिंगळे बलिदान शताब्दी सर्वत्र साजरी करण्यात आली. 
आपण थोडक्यात विष्णु गणेश पिंगळे यांच्या कार्याचा आढावा घेऊयात.  
  •  विष्णू गणेश पिंगळे यांचा जन्म  पुणे जिल्ह्यातील तळेगाव ढमढेरे, शिरूर तालुका या ठिकाणी एका मराठी ब्राह्मण कुटुंबात १८८८ साली झाला
  •  वॉशिंग्टन येथे जाऊन इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी पदवी मिळवली.
  • अमेरिकेत असताना लाला हरदयाल, भाई परमानंद, डॉ. खानखोजे, सोहनसिंग भाकना, भाई कर्तारसिंग आणि पंडित कांशीराम यांच्यासारख्या क्रांतिकारकांच्या  संपर्कात आल्यानंतर ते  स्वातंत्र्य चळवळ सामील झाले. ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र लढा देणाऱ्या गदर पक्षाचे सक्रिय सदस्य झाले.
  • पिंगळे यांनी आपले अभियांत्रिकीचे कौशल्य बॉम्ब बनविण्यासाठी वापरले. भारतात आल्यानंतर पंजाब प्रांतात ते विविध क्रांतिकारी कारवायांमध्ये सामील झाले.
  •  गदर पक्षाने पहिले महायुद्ध चालू असताना ब्रिटीश विरोधी उठावाची योजना केली होती. 
  • विविध भाषा अवगत असणाऱ्या आणि वेगवेगळी सोंग घेण्यात तरबेज पिंगळे यांनी गुप्तपणे गदर पक्षाने प्रकाशित ब्रिटिश विरोधी क्रांतिकारक पत्रके आणि वृत्तपत्र  भारतीय लष्करात प्रसारित करून अशांतता पसरवली.
  •  ब्रिटिशांनी १८ जिवंत बॉम्ब आणि स्फोटकांसाहित २४ मार्च,१९१५ रोजी त्यांना मेरठ कॅन्टोन्मेंट येथे  अटक केली. १६ नोव्हेंबर, १९१५ रोजी लाहोर केंद्रीय कारागृहात  सहा क्रांतिकारांसोबत त्यांना "लाहोर कटात" दोषी ठरवून  फाशी देण्यात आली. त्यावेळी पिंगळे अवघ्या २६ वर्ष वयाचे होते.

No comments:

Post a Comment

Team MPSC Insights