भारताचे नवे सरन्यायाधीश म्हणून न्या. तीरथ सिंग ठाकूर यांची निवड करण्यात आली आहे. न्या. ठाकूर हे सर्वोच्च
न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश असून ते विद्यमान सरन्यायाधीश एच. एल. दत्तू
यांच्याकडून २ डिसेंबर रोजी पदभार स्वीकारणार आहेत.
- न्या. ठाकूर हे भारताचे ४३ वे सरन्यायाधीश असतील.
- सरन्यायाधीश ज्येष्ठता क्रमानुसार नेमण्याची प्रथा आहे.
- केंद्रीय मंत्रिमंडळ सर्वोच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश असलेल्या व्यक्तीची शिफारस राष्ट्रपतींना करते. राष्ट्रपतींनी शिफारस मान्य केल्यानंतर, वरिष्ठ न्यायाधीशाची राष्ट्रपतीद्वारे भारताचे मुख्य न्यायाधीश म्हणून नेमणूक केली जाते.
न्या. तीरथ सिंग ठाकूर यांचे महत्त्वाचे खटले
- न्या. ठाकूर यांनी आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात निकाल दिला होता.
- शारदा चिटफंड प्रकरणाच्या तपासाठी नेमण्यात आलेल्या सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाचे ते प्रमुख होते.
- त्यांच्या खंडपीठासमोर कोट्यवधी रुपयांच्या 'एनआरएचएम' घोटाळ्याची सुनावणी सुरु आहे.
- लग्नाविना सहजीवन सुरू असले तरी अशा ‘लिव्ह इन’ जोडप्यांना घरगुती अत्याचार कायदा लागू होतोच’ हा २०१० सालचा गाजलेला निकाल देणाऱ्या न्यायमूर्तीद्वयातील एक न्यायाधीश तीरथ सिंग ठाकूर हे होते.
No comments:
Post a Comment