Sunday, 15 November 2015

एक श्रेणी एक पेन्शन (One Rank One Pension)

सरकारने अलीकडेच एक श्रेणी एक पेन्शन किंवा OROP याबाबतची प्रलंबित अधिसूचना जाहीर केली आहे.
ह्या घोषणेमुळे देशभरातील किमान २५ लाख माजी सैनिकांना त्यांच्या सेवेतील श्रेणी आणि सेवा कालावधीनुसार साधारणता: रुपये ३००० ते ५००० अधिक पेन्शन मिळणार आहे.
तपशील:
1.    पेन्शनमधील वाढ १ जुलै २०१४ पासून लागू केली जाईल.
2.    सरकार चार समान सहामाही हप्त्यांमध्ये ओआरओपी  थकबाकी देणार आहे.
3.  निवृत्ति पेन्शन ठरवण्यासाठी २०१३ हे आधारभूत वर्ष म्हणून घेण्यात आले आहे. २०१३ सालच्या आधारावर, निवृत्त झालेल्यांची पेन्शन निश्चित करण्यात येणार आहे.
4.   सरकारने  मुदतपूर्व निवृत्ती घेणाऱ्या (स्वेच्छानिवृत्ती) माजी सैनिकांना OROP पासून वंचित ठेवण्याचा वादग्रस्त प्रस्ताव मागे घेतला आहे. 
5.    सरकारने OROP च्या त्रुटी दूर करण्यासाठी एका एक सदस्यीय न्यायिक समितीची नियुक्ती जाहीर केली आहे. समिती  सहा महिन्यात आपला अहवाल सादर करणार आहे
6.    भविष्यात, पेन्शन दर ५ वर्षांनी पुन्हा निश्चित केली जाणार आहे.

7.    पेन्शन निश्चित करताना समान श्रेणी आणि सेवेचा समान काळ याचा विचार करून २०१३ मध्ये निवृत्त कर्मचा-यांच्या किमान आणि कमाल पेन्शनच्या  सरासरी आधारे सर्व निवृत्तीवेतन पुन्हा निश्चित केले जाईल.


No comments:

Post a Comment

Team MPSC Insights