पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय योजना
- शासनाच्या
विविध घरकुल लाभाच्या योजनांअंतर्गत प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी स्वतःच्या मालकीची
जागा असणे आवश्यक आहे. अशावेळी स्वतःची
जागा नसलेल्या दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना जागा खरेदीसाठी अर्थसहाय्य
करण्याकरीता राज्य शासनाने पंडित
दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना सुरु
केली आहे.
- दारिद्र्यरेषेखालील
घरकुल पात्र परंतु घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या लाभधारकांना लागू
राहील.
- केंद्र
पुरस्कृत इंदिरा आवास
योजनेतील दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन कुटुंबांना
जागा खरेदी करण्यासाठी केंद्र शासनामार्फत १० हजार व योजनेअंतर्गत रुपये ४० हजार
असे एकूण ५० हजारापर्यंत अर्थसहाय्य उपलब्ध
करुन देण्यात येणार आहे.
- रमाई आवास योजना व शबरी आवास योजना या राज्य
पुरस्कृत घरकुल योजनेतील दारिद्र्यरेषेखालील घरकुल पात्र भूमिहीन कुटुंबांना जागा
खरेदी करण्यासाठी या योजनेअंतर्गत ५० हजारापर्यंत अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यात
येईल. ही योजना दारिद्र्यरेषेवरील लाभधारकांसाठी लागू राहणार नाही.
No comments:
Post a Comment