Sunday, 7 February 2016

प्रकल्प सूर्योदय


1.    पूर्वोत्तर राज्यांमध्ये एड्सला प्रतिबंध करण्यासाठी प्रकल्प सूर्योदय सुरू
2.   केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांनी खास ८ उत्तर-पूर्व राज्यांतील लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात असणाऱ्या ड्रग आणि एड्सला प्रतिबंध करण्यासाठी प्रकल्प सूर्योदय सुरू केला आहे.
3.    हा विशेष एड्स प्रतिबंध प्रकल्प ड्रगच्या आहारी गेलेल्या ९० टक्के  व्यसनिंचे निदान करून २०२० पर्यंत उपचार करण्याचे उद्दिष्ट ठेवले  आहे.
4.  प्रकल्प सूर्योदयचे एचआयव्ही/एड्सने बाधित लोकांना मुख्य राष्ट्रीय प्रवाहात आणणे आणि पूर्वोत्तर राज्यांमध्ये रोगाबद्दल अधिक जागरूकता निर्माण करणे.
5.    राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटनेच्या अस्तित्वात असलेल्या प्रकल्प व्यतिरिक्त अंमलबजावणी केली जाईल.

6.    ईशान्येतील मणिपूर, नागालँड आणि मिझोराम राज्यात देशात सर्वात जास्त प्रौढ वयात (१५-४९ वर्षे) एचआयव्ही प्रभाव मोठ्या प्रमाणात असल्यामुळे हा प्रकल्प पूर्वोत्तर राज्यात राबविण्यात येणार आहे.

MPSC Insights QUIZ 9

1.    अलीकडे निधन झालेले  सुधीर तैलंग हे कुठल्या क्षेत्राशी संबंधित होते?
A. लेखक
B. व्यंगचित्रकार
C. दिग्दर्शक
D. संगीत दिग्दर्शक
2.    राष्ट्रीय सेंद्रिय शेती संशोधन संस्था कुठल्या राज्यात सुरु करण्यात येणार आहे?
A.मणिपूर
B.सिक्कीम
C.आसाम
D.मेघालय
3.    २०१६ ऑस्ट्रेलियन ओपन एकेरी पुरुष टेनिस स्पर्धेचा विजेता कोण आहे?
A. रॉजर फेडरर
B. नोवाक जोकोविच
C. अँडी मरे
D. मिलोस रोनिच
4.    ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस २०१६ महिला एकेरी  स्पर्धेची  विजेती  कोण आहे?
A. सेरेना विल्यम्स
B. मारिया शारापोव्हा
C. अन्गेलीक़ु कर्बेर
D.  व्हिक्टोरिया अझारेन्का
5.    भारतीय स्पर्धा आयोगाचे (Competition Commission of India) सध्याचे अध्यक्ष कोण आहेत?
A. श्री अशोक चावला
B. श्री अतुलेश जिंदाल
C. श्री ए .के. जैन
D. श्री देवेंदर कुमार सिक्री
6.    ३ जानेवारी पासून सुरु झालेले इंडियन सायन्स काँग्रेसचे १०३ वे अधिवेशन कुठल्या शहरात सुरु होते?
A.  बंगलोर
B. नवी दिल्ली
C. म्हैसूर
D. पुणे
7.    अल्फाबेट ही कुठल्या कंपनीची पालक कंपनी आहे -
A. याहू
B. गुगल
C. मायक्रोसॉफ्ट
D. सिस्को
8.    खालील पैकी कुठला दिवस भारत सरकारने राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून घोषित केला आहे?
A. ७ ऑगस्ट 
B. ९ ऑगस्ट
C. ११ ऑगस्ट
D. १५ ऑगस्ट
9.    मिशन इंद्रधनुष कशाशी संबंधित आहे -
A. युनिव्हर्सल लसीकरण कार्यक्रम
B.  सार्वजनिक क्षेत्रातील बँकेच्या पुनरुज्जीवन
C. इलेक्ट्रॉनिक उत्पादन विकास
D. ग्रामीण युवक कौशल्य विकास
10. खालील कुठल्या शहरात ३० वा आंतरराष्ट्रीय सूरजकुंड कलाकुसर मेळा सुरु  झाला आहे?
A. रांची
B. हैदराबाद
C. जयपूर
D. फरीदाबाद
11. खालील पैकी कुणाची सशस्र सीमा बल या संस्थेच्या पहिल्या महिला महासंचालक म्हणून निवड झाली आहे?
A. दीपा सागर
B. जे. मंजुळा
C.स्मिता  सभरवाल
D.अर्चना रामसुंदराम
Write your answers in comment section.... 

Answers will be provided in coming days


12 व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेला गुवाहाटी येथे सुरुवात

12 व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेला गुवाहाटी येथे सुरुवात
  • स्पर्धा  संयुक्तपणे गुवाहाटी आणि मेघालयची राजधानी शिलाँग येथे आयोजित केल्या जात आहेत.
  • भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, नेपाळ, भूतान आणि मालदीव या ८ सार्क राष्ट्रातील सुमारे २५०० खेळाडू सहभागी झाले आहेत.
  • स्पर्धेचे घोषवाक्य : 'शांती, प्रगती आणि समृद्धीसाठी खेळा
  • अधिकृत शुभंकर (mascot) - तीखोर- आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आढळणारे एकशिंगी गेंडा

दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेबद्दल
  • स्पर्धा ८ दक्षिण आशियाई (सार्क) देशांमधिल खेळाडूत आयोजित केली जाते. 
  • स्पर्धा सर्वप्रथम १९८४ साली काठमांडू नेपाल येथे आयोजित करण्यात आली होती. तद्नंतर काही अपवाद वगळता दर २ वर्षांनी स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.
  • भारताने याआधी  दोन वेळा  प्रथम कोलकाता (पश्चिम बंगाल) १९८७, आणि आणि दुसऱ्यांदा १९९५ मध्ये चेन्नई (तमिळनाडू) येथे आयोजित करण्यात आल्या होत्या.



Saturday, 6 February 2016

राष्ट्रीय वारसा शहर विकास योजना

                                               राष्ट्रीय वारसा शहर विकास योजना
योजनेबद्दल थोडक्यात
  • भारत सरकारच्या शहरी विकास मंत्रालयाने, सांस्कृतिक वारसा लाभलेल्या शहरांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राष्ट्रीय वारसा शहर विकास योजना (National Heritage City Development and Augmentation Yojana- HRIDAY) सुरू केली आहे.
  • या योजनेंतर्गत आवश्यक पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी प्रयत्न करून, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक तसेच पर्यावरण सुधारणा करण्यात येतील. तसेच श्रीमंत सांस्कृतिक वारस्याचे संवर्धन आणि पर्यटक आणि यात्रेकरू यांना चांगल्या सुविधा पुरवण्यासाठी सक्षम करणे हा उद्देश आहे.
  • योजना १२ शहरांमध्ये राबविली जाणार असून त्यासाठी ५०० कोटींचा निधी मंजूर करण्यात असून खालील शहरांचा समावेश करण्यात आला आहे.
  • अजमेर, अमरावती, अमृतसर, बदामी, द्वारका, गया, कांचीपुरम, मथुरा, पुरी, वाराणसी, वेलांकांनी आणि वारंगल.

MPSC Insights QUIZ 8 ANSWERS


1.    भारताचे कौशल्य विकास मंत्री कोण आहेत ?
A. राजीव प्रताप रुडी
B. निर्मला सत्यनारायण
C. रवि प्रसाद शंकर
D. मनोहर पर्रीकर
राजीव प्रताप रुडी

2.    शिपिंग मंत्रालयाने " ग्रीन बंदरे प्रकल्प " सुरू केला आहे. हा प्रकल्प मोदी सरकारने सुरू केलेल्या खालील कोणत्या योजनेला मदत करेल?
A. स्किल इंडिया
B. स्मार्ट  सिटी मिशन
C. स्वच्छ भारत
D. मेक इन इंडिया
स्वच्छ भारत
3.    १९ वी  ई-गव्हर्नन्स राष्ट्रीय परिषद खालील कुठल्या ठिकाणी कोणत्या आयोजित होईल?
A. पुणे
B.नागपूर
C.मुंबई
D. दिल्ली
नागपूर


4.    कुठले राज्य  भारतातील पहिले सेंद्रीय शेती राज्य म्हणून घोषित करण्यात आले?
A. केरळ 
B. सिक्कीम
C. गोवा
D. तेलंगाना
सिक्कीम

5.    कोणत्या देशाने नुकतीच आर्थिक आणीबाणी घोषित केली आहे?
A. जर्मनी
B. इटली
C. स्पेन
D. फ्रांस
फ्रांस
6.    कोणत्या बहुपक्षीय संघटनेद्वारे जागतिक पर्यटन बॅरोमीटर या नावाने अहवाल जाहीर केला जातो?
A.  World Bank
B.  UNWTO
C. International Monetary Fund
D. World Economic Forum
UNWTOUnited Nations World Tourism Organization

7.    कोणत्या युरोपियन शहरात वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ४६ व्या वार्षिक सभेला २० जानेवारी २०१६ रोजी सुरुवात झाली?
A . लंडन
B . बर्लिन
C . डावोस
D . पॅरिस
 डावोस

8.    नासा या संस्थेनुसार पहिल्यांदाच अंतराळात वाढलेल्या फुलाचे नाव काय आहे?
A . झीन्निया (Zinnia)
B . गुलाब
C . पेओनि (Peony)
D .  ईरीस (Iris)
ईरीस (Iris)
9.    खालील पैकी ट्विटरवर दुसरा क्रमांक असलेले (followers) भारतीय कोण आहेत?
A. आमीर खान
B. अमिताभ बच्चन
C. शाहरुख खान
D. नरेंद्र मोदी
नरेंद्र मोदी


Team MPSC Insights