Sunday, 7 February 2016

12 व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेला गुवाहाटी येथे सुरुवात

12 व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेला गुवाहाटी येथे सुरुवात
  • स्पर्धा  संयुक्तपणे गुवाहाटी आणि मेघालयची राजधानी शिलाँग येथे आयोजित केल्या जात आहेत.
  • भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, नेपाळ, भूतान आणि मालदीव या ८ सार्क राष्ट्रातील सुमारे २५०० खेळाडू सहभागी झाले आहेत.
  • स्पर्धेचे घोषवाक्य : 'शांती, प्रगती आणि समृद्धीसाठी खेळा
  • अधिकृत शुभंकर (mascot) - तीखोर- आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आढळणारे एकशिंगी गेंडा

दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेबद्दल
  • स्पर्धा ८ दक्षिण आशियाई (सार्क) देशांमधिल खेळाडूत आयोजित केली जाते. 
  • स्पर्धा सर्वप्रथम १९८४ साली काठमांडू नेपाल येथे आयोजित करण्यात आली होती. तद्नंतर काही अपवाद वगळता दर २ वर्षांनी स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.
  • भारताने याआधी  दोन वेळा  प्रथम कोलकाता (पश्चिम बंगाल) १९८७, आणि आणि दुसऱ्यांदा १९९५ मध्ये चेन्नई (तमिळनाडू) येथे आयोजित करण्यात आल्या होत्या.



No comments:

Post a Comment

Team MPSC Insights