Tuesday, 22 December 2015

आंतरराष्ट्रीय अणु ऊर्जा एजन्सी (IAEA)

आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी  ही अणु क्षेत्रात काम करणारी एक जागतिक संस्था आहे.
  • संस्थेची स्थापना युनायटेड नेशन्स कुटुंबांतर्गत १९५७  मध्ये जागतिक  "शांती साठी अणू" या उद्देशाने करण्यात आली आहे.
  • अणुऊर्जेच्या शांततापूर्ण वापराला प्रोत्साहन  देण्यासाठी,आणि आण्विक शस्त्रे आणि लष्करी उद्देश टाळण्यासाठी संस्था काम करते.
  • ही संस्था थेट यूएनच्या नियंत्रणाखाली नाही.
  • आंतरराष्ट्रीय अणु ऊर्जा एजन्सीची स्थापना जरी एका स्वतंत्र आंतरराष्ट्रीय कराराने करण्यात केलेली असली तरी, संस्था आपल्या कामगिरीचा अहवाल वेळोवेळी  संयुक्त राष्ट्रसंघाच्या जनरल विधानसभा आणि सुरक्षा परिषद या दोघांना सादर करण्यात येतो.
  • आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीचे  सचिवालय व्हिएन्ना इंटरनॅशनल सेंटर, व्हिएन्ना, ऑस्ट्रिया येथे आहे.
  • आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी आण्विक तंत्रज्ञान आणि जगभरातील अणुऊर्जा शांततापूर्ण वापरासाठी आणि  वैज्ञानिक आणि तांत्रिक सहकार्यासाठी एक संघटना मंच म्हणून काम करते.
  • सध्या १६४ देश संस्थेचे सदस्य राष्ट्र आहेत.

दिलीप कुमार यांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान

प्रसिध्द अभिनेते दिलीप कुमार यांना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • पेशावर मध्ये मुहम्मद युसुफ खान या नावाने जन्म झालेल्या, दिलीप कुमार यांनी  बॉम्बे टॉकीज निर्मीत ज्वार भाट या चित्रपटाद्वारे १९४४ मध्ये एक अभिनेता म्हणून पदार्पण केले.
  • सहा दशकांपेक्षा अधिक काळ असलेल्या काराकीर्तीत त्यांनी विविध शैलीच्या भूमिका केल्यात. अंदाज  (१९४९), आन (१९५२), देवदास (१९५५), आझाद  (१९५५), मुघल-ए-आझम (१९६०) व गंगा जमुना (१९६१)
  • भारत सरकारने दिलीपकुमार यांनी भारतीय सिनेमाला दिलेल्या आपल्या असामान्य व प्रतिष्ठीत योगदानाबद्दल, १९९१ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने, १९९४ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार आणि यंदा पद्मविभूषण पुरस्काराने सम्मानित करून  गौरव केला आहे.

पद्मविभूषण:
  • देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक पुरस्कार आहे. या पुरस्कारांची सुरुवात १९५४ साली करण्यात आली. पद्मविभूषण हा दुसऱ्या क्रमांकाचा नागरी पुरस्कार आहे. खालील क्षेत्रात अपवादात्मक व प्रतिष्ठीत सेवा देणाऱ्यांना ह्या पुरस्काराने सम्मानित करण्यात येते.
  • कला, सामाजिक कार्य, सार्वजनिक व्यवहार, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, औषध, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, नागरी सेवा इ.


Sunday, 13 December 2015

सर्वोच्च न्यायालयाकडून हरियाणा पंचायत कायद्याला हिरवा कंदील

हरियाणा पंचायती राज (सुधारणा) अधिनियम, २०१५ मधील पंचायत निवडणूक लढवण्यासाठी किमान शैक्षणिक पात्रतेची तरतूद सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवली आहे.
न्यायालयाने मूलभूत शिक्षण पंचायत कर्तव्ये प्रभावीपणे  पार पाडण्यासाठी उमेदवाराला सक्षम करते असे मत नोंदवले आहे. शिक्षणामुळे चांगल्या आणि वाईट मधील फरक कळण्यास मदत होते.
पार्श्वभूमी:
  • हरियाणा राज्य सरकारने अलीकडेच हरयाणा पंचायती राज (सुधारणा) कायदा २०१५ याची अधिसूचना जाहीर केली होती.
  • दुरुस्ती नुसार, सर्वसाधारण प्रवर्गासाठी किमान आवश्यक पात्रता दहावी पास, सर्वसाधारण वर्गातील महिला आणि अनुसूचित जातीतील पुरुष जर निवडणूक लढवत असतील तर वर्ग आठवी पास असणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती वर्गातील महिला वर्ग पाचवी पास असणे आवश्यक आहे.
  • दुरुस्ती नुसार  उमेदवारची  सहकारी बँकेत  कोणतीही थकबाकी असू  नये, वीज बिले अदा करणे आणि उमेदवाराच्या घरात चालू स्थितीतील शौचालय असावा.
  • हरियाणा याशिवाय, राजस्थानमध्ये देखील अलीकडेच पंचायती राज संस्था निवडणूक किमान शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे.




Saturday, 12 December 2015

MPSC Insights QUIZ 7 ANSWERS

1.   २०१५-१६ या आर्थिक वर्षात वर्षाच्या पहिल्या सहामाहीत भारतात सर्वाधिक  थेट विदेशी गुंतवणूक (एफडीआय) कुठल्या  देशातून झाली आहे?
A  मॉरिशस
B  सिंगापूर
C  जपान
D  युनायटेड किंगडम
सिंगापूर
2.   फॉरेस्ट रिपोर्ट २०१५ नुसार भारतातील एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी किती टक्के क्षेत्र जंगल संरक्षित आहे?
A  २०.३६%
B  २१.३४%
C  २३.२८%
D  २४.१६%
२१.३४%
3.   रिझर्व्ह बँकेने आरआरबी (Regional Rural Bank) साठी सुधारित प्राधान्य क्षेत्रातील कर्ज लक्ष्य (Priority Sector lending) किती केले आहे?
A  ६० %
B  ६५ %
C  ७० %
D  ७५ %
७५ %
4.   भारताच्या प्राणीशास्त्रविषयक सर्वेक्षण कार्यालयाचे (Zoological Survey of India-ZSI) मुख्यालय कोणत्या शहरात आहेत?
A  बंगलोर
B  डेहराडून
C  कोलकाता
D  भुवनेश्वर
कोलकाता
5.   खालील कुठली लस भारताच्या इनजेक्टेबल पोलिओ लस डोस  (injectable inactivated polio vaccine-IPV) कार्यक्रमांतर्गत वापरली जाते?
A भारती IPV लस
B शान IPV लस
C निर्मल IPV लस
D सानोफील IPV लस
शान IPV लस
6.   हिंदू आणि बौद्ध स्थापत्य कलेतून प्रेरणा घेऊन बनवलेला तोरणा दरवाजा (Torana Gate) कुठल्या देशात आहे?
A. सिंगापूर
B. मलेशिया
C.थायलंड
D.म्यानमार
मलेशिया
7.   खालील कुठली समिती जीएसटी अंतर्गत संभाव्य करांचे दर ठरवण्यासाठी नेमण्यात आली होती?
A  जयंती घोष समिती
B  अभिजित बॅनर्जी समिती
C  अरविंद सुब्रमण्यम समिती
D  कौशिक बसू समिती
अरविंद सुब्रमण्यम समिती
8.   आंतरराष्ट्रीय अपंग व्यक्ती दिवस कुठल्या तारखेला असतो?
A. ५ डिसेंबर
B. १ डिसेंबर 
C. ३० नोव्हेंबर
D. ३ डिसेंबर
३ डिसेंबर
9.   कोणत्या उद्देशाने, ज्ञान योजना (GIAN) केंद्र सरकारने सुरू केले आहे?
A सौर क्षेत्राला चालना देण्यासाठी
B दूरसंचार क्षेत्राला चालना देण्यासाठी
C ग्रामीण आरोग्य सेवेला चालना देण्यासाठी
D उच्च शिक्षणाला चालना देण्यासाठी
उच्च शिक्षणाला चालना देण्यासाठी
10.               क्रेडिट रेटिंग एजन्सी ब्रिकवर्क नुसार, भारतातील कुठल्या राज्याची अर्थव्यवस्था भारतातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास आली आहे?
A. तामिळनाडू
B. दिल्ली
C. कर्नाटक
D. महाराष्ट्र
महाराष्ट्र

 


Thursday, 10 December 2015

‘माझी कन्या भाग्यश्री’ योजना

मुलींच्या शिक्षण, आरोग्य व उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक तरतूद करणे, यासह बालिका भृणहत्या रोखणे, बालविवाह रोखणे, मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार रुजविण्यासाठी ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजना राज्यात राबवली जात आहे.
  • दारिद्र्यरेषेखालील कुटुंबात जन्मणाऱ्या मुलींसाठी विमा योजना राबविण्यात येणार असून यामध्ये मुलींच्या जन्मानंतर एक वर्षाच्या आत २१ हजार २०० रुपयांचा विमा एल.आय.सी. मध्ये शासनामार्फत काढण्यात येणार आहे. यासाठी मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर एक लाख रुपयांच्या विम्याची रक्कम अदा करण्यात येणार आहे.
  • मुलीच्या पालकांचाही विमा काढण्यात येणार असून यामध्ये मुलींच्या पालकांचा अपघात किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास पुढीलप्रमाणे विम्याची रक्कम मिळणार आहे.
  • नैसर्गिक मृत्यु झाल्यास ३० हजार रुपये, अपघाती मृत्यू झाल्यास ७५ हजार रुपये, दोन डोळे किंवा दोन अवयव निकामी झाल्यास ७५ हजार रुपये, एक डोळा अथवा एक अवयव अपघातामुळे निकामी झाल्यास ३७ हजार ५०० रुपये विम्याचा लाभ मिळणार आहे.
  • पहिल्या मुलीनंतर मातेने कुटुंब नियोजन केले असल्यास आजी आजोबांनाही म्हणजे मुलीच्या मातेच्या सासू सासऱ्यांना ५ हजार रुपयांपर्यंत सोन्याची नाणी व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
  • ज्या गावामध्ये मुला-मुलींचे लिंग गुणोत्तर एक हजारापेक्षा जास्त असेल अशा प्रत्येक जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीला पाच लाखाचे पारितोषिक देण्यात येणार आहे.
  • योजनेमध्ये ज्या मातेने एकुलत्या एका मुलीवर अंतिम कुटुंब नियोजन केलेले आहे, अशा लाभार्थ्यांना मुलीचा जन्मदिन साजरा करण्यासाठी ५ हजार रुपये, मुलगी ५ वर्षे वयाची होईपर्यंत दर्जेदार पोषण आहार देण्यासाठी ५ वर्षांकरीता १० हजार रुपये, मुलीच्या ६वी ते १२ वी पर्यंतच्या शिक्षणादरम्यान पोषण आहार व इतर खर्चासाठी ७ वर्षांकरीता एकूण २१ हजार रुपये इतका लाभ मिळणार आहे.
  • ज्या मातेला एक मुलगी असून दुसऱ्या मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेली आहे, अशा परिस्थितीत जन्मदिन साजरा करण्यासाठी २ हजार ५०० रुपये, दोन्ही मुली ५ वर्षे वयाच्या होईपर्यंत दर्जेदार पोषण आहार देण्यासाठी ५ वर्षांसाठी १० हजार रुपये, दोन्ही मुलींना इयत्ता १ ली ते ५ वी पर्यंत पोषण आहार व इतर खर्चासाठी ५ वर्षांसाठी १५ हजार रुपये, दोन्ही मुलींना इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंत पोषण आहार व इतर खर्चासाठी ७ वर्षांसाठी २२ हजार रुपये लाभ देण्यात येणार आहे. 
  • १ मुलगी व १ मुलगा असलेल्या बालकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • २०११ च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात मुलांचे लिंग गुणोत्तर ८९४ आहे.
Source: Maharashtra Govt.

"सुगम्य भारत अभियान"

केंद्र सरकारने "सुगम्य भारत अभियान" (Accessible India Campaign) अपंग असलेल्या व्यक्तींसाठी  सुरू केले  आहे.
अभियानाचे ध्येय: अपंग व्यक्तींना वैश्विक प्रवेश, जीवनाचे सर्व पैलू विकासीत करण्यासाठी समान संधी आणि सर्वसमावेशक समाजात स्वावलंबी जीवन आणि सहभागासाठी प्रयत्न करणे. 
  • सुगम्य भारत मोहिमेअंतर्गत सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि रेल्वेस्थानक जुलै २०१६ पर्यंत विकलांग व्यक्तींच्या गरजा लक्षात  घेऊन सुसज्ज करण्यात येईल.
  • सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने तयार केलेल्या मोहीमेनुसार, देशातील सर्व सरकारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील वाहनातील कमीत कमी १०% मार्च २०१८ पर्यंत अपंग व्यक्तींना पूर्णतः प्रवेशयोग्य वाहनांमध्ये रुपांतरीत केले जातील.
  • जुलै २०१८ पर्यंत, राष्ट्रीय राजधानी आणि राज्य राजधानी यातील सर्व सरकारी इमारतीतील कमीत कमी ५०% इमारती अपंग व्यक्तींच्या गरजेनुसार पूर्णपणे उपलब्ध केले जाईल.
  • केंद्र सरकार व राज्य सरकार द्वारे जाहीर सर्व सार्वजनिक दस्तऐवजापैकी  कमीत कमी ५० % ऐवज  मार्च २०१८ पर्यंत अपंग व्यक्तींच्या मानकांना अनुरूप बनवले जातील.



Tuesday, 8 December 2015

नवीन अहवालानुसार भारतातील जंगलात वाढ

भारतीय वन सर्वेक्षणाद्वारे (FSI)  नुकत्याच प्रकाशीत द्वैवार्षिक अहवालानुसार भारतातील वन क्षेत्रात २०१३ सालच्या तुलनेत ३७७५ चौरस किलोमीटरने वाढ झाली आहे.
एफएसआय (Forest Survey of India) १९८७ पासून देशातील वन आणि झाड संसाधने यांचे नियमित मोजमाप आणि मूल्यांकन करते आणि एक द्वैवार्षिक अहवाल प्रकाशित करते.
  • विशेष म्हणजे २००७ पासून स्थिर असणाऱ्या अतिशय दाट जंगलात २४०२ चौ.किमी वाढ नोंदवली गेलेली आहे.
  • २०१५ अहवालानुसार  मुख्य वनापैकी २५११ चौरस किलोमीटर वन क्षेत्र पूर्णपणे नाहीशी झाली आहेत, तर नॉन-फॉरेस्ट भागात ११३५ चौरस किलोमीटर क्षेत्र फार दाट किंवा  दाट जंगलात रुपांतरीत  झाले आहेत, हे लक्षात येते.
  • २०१३ च्या तुलनेत २४०२ चौरस किलोमीटर अतिशय दाट वनातील वाढ प्रामुख्याने अंदमान आणि निकोबार बेटे, उत्तर प्रदेश आणि तमिळनाडू येथील सकारात्मक वाढीमुळे झाली आहे.
  • क्षेत्रफळानुसार सर्वात जास्त वनक्षेत्र असलेले राज्य

१) मध्य प्रदेश ७७४६२ चौरस किलोमीट
२) अरुणाचल प्रदेश ६७२४८ चौरस किलोमीटर
३) छत्तीसगड ५५५८६ चौरस किलोमीटर 
  • सर्वाधिक वनक्षेत्रानुसार

           १) मिझोराम (८८.९%)
           २) लक्षद्वीप (८४.६%)
  • अंदमान आणि निकोबार, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मेघालय आणि मणिपूर या राज्यात वन क्षेत्र ७५% पेक्षा अधिक आहे

महाराष्ट्र
  • अहवालानुसार महाराष्ट्रातील एकूण भौगोलिक क्षेत्राच्या २०.०१% क्षेत्र  वनांनी व्यापलेले आहे. (६१५७९ चौ.किमी/३०७७१३ चौ.किमी)
  • महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांत देशभरात सर्वाधिक खारफुटी वनांची वाढ झाली आहे.
  • अतिक्रमण आणि बिगर वनीकरण हेतूने वन भागातील फेरफार यामुळे  महाराष्ट्रातील  वनक्षेत्र कमी झाले आहे. दोन वर्षांच्या कालावधीमध्ये  फार दाट जंगल आणि मध्यम दाट जंगल मध्ये किंचित घसरण झाली आहे.
  • २०१३ सालच्या मागील आकडेवारीच्या तुलनेत महाराष्ट्रातील खुल्या जंगलात २७ चौरस किलोमीटर वाढ झाली आहे. 


MPSC Insights QUIZ 7

1.   २०१५-१६ या आर्थिक वर्षात वर्षाच्या पहिल्या सहामाहीत भारतात सर्वाधिक  थेट विदेशी गुंतवणूक (एफडीआय) कुठल्या  देशातून झाली आहे?
A  मॉरिशस
B  सिंगापूर
C  जपान
D  युनायटेड किंगडम
2.   फॉरेस्ट रिपोर्ट २०१५ नुसार भारतातील एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी किती टक्के क्षेत्र जंगल संरक्षित आहे?
A  २०.३६%
B  २१.३४%
C  २३.२८%
D  २४.१६%
3.   रिझर्व्ह बँकेने आरआरबी (Regional Rural Bank) साठी सुधारित प्राधान्य क्षेत्रातील कर्ज लक्ष्य (Priority Sector lending) किती केले आहे?
A  ६० %
B  ६५ %
C  ७० %
D  ७५ %
4.   भारताच्या प्राणीशास्त्रविषयक सर्वेक्षण कार्यालयाचे (Zoological Survey of India-ZSI) मुख्यालय कोणत्या शहरात आहेत?
A  बंगलोर
B  डेहराडून
C  कोलकाता
D  भुवनेश्वर
5.   खालील कुठली लस भारताच्या इनजेक्टेबल पोलिओ लस डोस  (injectable inactivated polio vaccine-IPV) कार्यक्रमांतर्गत वापरली जाते?
A भारती IPV लस
B शान IPV लस
C निर्मल IPV लस
D सानोफील IPV लस
6.   हिंदू आणि बौद्ध स्थापत्य कलेतून प्रेरणा घेऊन बनवलेला तोरणा दरवाजा (Torana Gate) कुठल्या देशात आहे?
A. सिंगापूर
B. मलेशिया
C.थायलंड
D.म्यानमार
7.   खालील कुठली समिती जीएसटी अंतर्गत संभाव्य करांचे दर ठरवण्यासाठी नेमण्यात आली होती?
A  जयंती घोष समिती
B  अभिजित बॅनर्जी समिती
C  अरविंद सुब्रमण्यम समिती
D  कौशिक बसू समिती
8.   आंतरराष्ट्रीय अपंग व्यक्ती दिवस कुठल्या तारखेला असतो?
A. ५ डिसेंबर
B. १ डिसेंबर 
C. ३० नोव्हेंबर
D. ३ डिसेंबर
9.   कोणत्या उद्देशाने, ज्ञान योजना (GIAN) केंद्र सरकारने सुरू केले आहे?
A सौर क्षेत्राला चालना देण्यासाठी
B दूरसंचार क्षेत्राला चालना देण्यासाठी
C ग्रामीण आरोग्य सेवेला चालना देण्यासाठी
D उच्च शिक्षणाला चालना देण्यासाठी
10.   क्रेडिट रेटिंग एजन्सी ब्रिकवर्क नुसार, भारतातील कुठल्या राज्याची अर्थव्यवस्था भारतातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास आली आहे?
A. तामिळनाडू
B. दिल्ली
C. कर्नाटक
D. महाराष्ट्र
Write your answers in comment section.... 
Answers will be provided in coming days

Friday, 4 December 2015

देशात महाराष्ट्र राज्याची सर्वात मोठी अर्थव्यवस्था : ब्रिकवर्क अहवाल

क्रेडिट रेटिंग एजन्सी ब्रिकवर्कने नुकत्याच प्रदर्शित केलेल्या अहवालानुसार, महाराष्ट्र राज्य भारतात सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून घोषित करण्यात आली   आहे.
महाराष्ट्राचे  स्थूल राज्यांतर्गत उत्पादन (जीएसडीपी) सर्वाधीक १६.८७ लाख कोटी रुपये असून त्यानंतर तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश या राज्यांचा नंबर लागतो.
अहवालातील काही ठळक मुद्दे
  • महाराष्ट्र राज्याचा जीएसडीपी आर्थिक वर्ष २०१४-१५ मध्ये ११.६९ टक्क्यानी वाढलेला आहे. मोठ्या राज्यांमध्ये महाराष्ट्रात  सर्वाधिक अंदाजे ७० टक्के  कर महसूली मिळकतीतून गोळा केला जातो.  
  • आर्थिक वर्ष २०१४-१५ मध्ये, १) गुजरात आणि २) महाराष्ट्र राज्याच्या उत्पादन क्षेत्राचा वाटा अनुक्रमे जीएसडीपीच्या २७.२६ टक्के आणि २५. ८ टक्के इतक्या प्रमाणात आहे. ३) तामिळनाडूत (१९.१%) ४) झारखंड (१८.८%) ५) हरयाणा (१८.१%).
  • सेवा क्षेत्रातील कामागरीत कर्नाटक राज्य भारतात अग्रेसर आहे. २) तामिळनाडू ३) महाराष्ट्र ४) आंध्र प्रदेश यांचा क्रमांक लागतो.
  • भारतात सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्था : १) बिहार (१७.०६%) २) मध्य प्रदेश (१६.८६%) ३) गोवा (१६.४३%)
  • भारतात सर्वाधिक धीम्या गतीने वाढणाऱ्या अर्थव्यवस्था : १) तेलंगणा (५.३%) २) पंजाब (१०.१६%) ३)  राजस्थान (११%)
  • महाराष्टाचा बालमृत्यू दर २५ असून तो राष्ट्रीय सरासरी ५० च्या अर्धा आहे. 
  • कृषी क्षेत्राचा सर्वाधिक वाटा असणारी पहिल्या पाच राज्यांमध्ये पंजाब, मध्य प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल यांचा समावेश होतो.
  • राज्यांच्या एकूण खर्चात सर्वाधिक खर्च सामाजिक सेवांच्या दिशेने ४३ टक्के, आर्थिक सेवा २२ टक्के आणि सामान्य सेवेंसाठी २३% खर्च केले जातात.  

केंद्र सरकारतर्फे उच्च शिक्षणाला चालना देण्यासाठी ज्ञान योजना (GIAN Scheme) सुरू

मानव संसाधन विकास मंत्रालयाने (मनुष्यबळ विकास) भारतातील उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेला चालना देण्यासाठी ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑफ अकॅडेमीक नेटवर्क- ज्ञान ही योजना (Global Initiative of Academic Networks) सुरू केली आहे.
ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑफ अकॅडेमीक नेटवर्क योजनेबद्दल-
  • योजनेअन्तर्गत आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या माध्यमातून देशातील उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारण्याचे उद्दिष्ट आहे.
  • उच्च दर्जाच्या आंतरराष्ट्रीय शिक्षणतज्ज्ञ यांच्या सहभागाने भारतीय शिक्षण संस्थामध्ये अल्पकालीन अभ्यासक्रम आणि कार्यक्रम यांचे आयोजन करणे.
  • सुरुवातीला ५०० आंतरराष्ट्रीय प्राध्यापकांना या आयोजित अभ्यासक्रमात सहभागी होतील आणि त्यानंतरच्या वर्षांमध्ये १००० प्राध्यापकांना  भारतभर ज्ञान योजनेअंतर्गत गुंतवले जाईल.
  • अभ्यासक्रमांचा कालावधी विषयानुसार एक ते तीन आठवडे  इतका असेल आणि यजमान संस्थेतील विद्यार्थ्यांना मोफत आणि इतरांना नाममात्र शुल्कासहित उपलब्ध असेल.
  • हे अभ्यासक्रम आयआयटी खरगपूरने तयार केलेल्या वेब पोर्टल www.gian.iitkgp.ac.in माध्यमातून देशभरात विद्यार्थ्यांपर्यंत  थेट पोहचविले जाईल.

Thursday, 3 December 2015

MPSC Insights QUIZ 6 ANSWERS

1.    अलीकडेच  युनायटेड नेशन्सने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार प्रत्येक वर्षी कुठल्या प्रदूषणामुळे लाखो लोकांचा अकाली मृत्यू होतो असा उल्लेख केलेला आहे?
A. जलप्रदूषण
B. भू-प्रदूषण
C. हवा-प्रदूषण
D. थर्मल प्रदूषण
हवा-प्रदूषण
2.    प्रथम दिवस-रात्र कसोटी सामना अॅडलेड येथे २७ नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू झाला. यात वापरल्या जाणाऱ्या चेंडूचा रंग कोणाता आहे?  
A.  गुलाबी
B.  जांभळा
C.  पिवळा
D.  लाल
गुलाबी
3.    २७ नोव्हेंबर २०१५ रोजी पहिल्यांदाच इस्रायली नौदलाच्या प्लॅटफॉर्मवरून यशस्वीरित्या उड्डाण चाचणी करण्यात आलेल्या लांब पल्ल्याचे जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रचे नाव?
A  धनुष क्षेपणास्त्र
ब) बराक -८
क) पृथ्वी २
ड) अग्नी १
बराक -८

4.    कोणत्या संस्थेने २०१५ सर्वाधिक तापमान असलेले वर्ष म्हणून नुकतेच घोषित केले आहे?
A. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम
B. जागतिक आरोग्य संघटना
C जागतिक पर्यटन संघटना
D.जागतिक हवामान संघटना
जागतिक हवामान संघटना
5.    भारत सरकारने ८ वर्ष कालावधी असलेले गोल्ड बाँड जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत किमान किती ग्रॅम किमतीचे बाँड घेणे अनिवार्य आहे?
A. १ ग्रॅम
B. ४ ग्रॅम
C. २ ग्रॅम
D. ५ ग्रॅम
२ ग्रॅम
6.    भारतातील कुठल्या राज्यात एप्रिल २०१६ पासून दारू विक्रीवर बंदी घालण्यात येणार आहे?
A. तामिळनाडू
B. केरळ
C. बिहार
D. हरियाणा
बिहार
7.    खालीलपैकी कुठल्या बँकेने कमी उत्पन्न असणाऱ्या राज्यांना मदत करण्यासाठी नीव नावाचा निधी सुरू केला आहे?
A. आयसीआयसीआय बँक
B. अॅक्सिस बँक
C. एसबीआय
D. यापैकी नाही
एसबीआय - या निधीचा वापर, पाणी आणि स्वच्छता, स्वच्छ ऊर्जा आणि शहरी क्षेत्रातील लहान पायाभूत सुविधा विकास इत्यादीसाठी करण्यात येणार आहे.
8.    महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अंतर्गत प्रत्येक शेतक-याला किती किमतीचे  वार्षिक विमा संरक्षण मिळणार आहे?
A.Rs १ लाख
B.Rs १.५ लाख
C.Rs ३ लाख
D.Rs २ लाख
Rs २ लाख
9.    टार्गेट ऑलिम्पिक पोडीअम योजनेच्या  (TOPS) अध्यक्षपदी खालील कोणत्या खेळाडूला नियुक्त केले आहे?
A. इंदरजित  सिंग
B. अंजू बॉबी जॉर्ज
C.अभिनव बिंद्रा
D. अनुराग ठाकूर
अंजू बॉबी जॉर्ज
10. भारत सरकारने कुणासाठी सुगम्य भारत अभियान सुरु केले आहे?
A. वृद्ध व्यक्तिंसाठी
B. अपंग व्यक्तिंसाठी
C. अंध व्यक्तींसाठी
D. विधवा महिलांसाठी
अपंग व्यक्तिंसाठी




Team MPSC Insights