क्रेडिट
रेटिंग एजन्सी ब्रिकवर्कने नुकत्याच प्रदर्शित केलेल्या अहवालानुसार, महाराष्ट्र राज्य
भारतात सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून घोषित करण्यात आली आहे.
महाराष्ट्राचे स्थूल राज्यांतर्गत उत्पादन (जीएसडीपी) सर्वाधीक १६.८७ लाख
कोटी रुपये असून त्यानंतर तामिळनाडू आणि उत्तर
प्रदेश या राज्यांचा नंबर लागतो.
अहवालातील
काही ठळक मुद्दे
- महाराष्ट्र राज्याचा जीएसडीपी आर्थिक वर्ष २०१४-१५ मध्ये ११.६९ टक्क्यानी वाढलेला आहे. मोठ्या राज्यांमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक अंदाजे ७० टक्के कर महसूली मिळकतीतून गोळा केला जातो.
- आर्थिक वर्ष २०१४-१५ मध्ये, १) गुजरात आणि २) महाराष्ट्र राज्याच्या उत्पादन क्षेत्राचा वाटा अनुक्रमे जीएसडीपीच्या २७.२६ टक्के आणि २५. ८ टक्के इतक्या प्रमाणात आहे. ३) तामिळनाडूत (१९.१%) ४) झारखंड (१८.८%) ५) हरयाणा (१८.१%).
- सेवा क्षेत्रातील कामागरीत कर्नाटक राज्य भारतात अग्रेसर आहे. २) तामिळनाडू ३) महाराष्ट्र ४) आंध्र प्रदेश यांचा क्रमांक लागतो.
- भारतात सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्था : १) बिहार (१७.०६%) २) मध्य प्रदेश (१६.८६%) ३) गोवा (१६.४३%)
- भारतात सर्वाधिक धीम्या गतीने वाढणाऱ्या अर्थव्यवस्था : १) तेलंगणा (५.३%) २) पंजाब (१०.१६%) ३) राजस्थान (११%)
- महाराष्टाचा बालमृत्यू दर २५ असून तो राष्ट्रीय सरासरी ५० च्या अर्धा आहे.
- कृषी क्षेत्राचा सर्वाधिक वाटा असणारी पहिल्या पाच राज्यांमध्ये पंजाब, मध्य प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल यांचा समावेश होतो.
- राज्यांच्या एकूण खर्चात सर्वाधिक खर्च सामाजिक सेवांच्या दिशेने ४३ टक्के, आर्थिक सेवा २२ टक्के आणि सामान्य सेवेंसाठी २३% खर्च केले जातात.
No comments:
Post a Comment