महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्याने निवडणूक
प्रक्रिया सुरु केली आहे. मतदान दि. १६ फेब्रुवारी २०१७ रोजी होणार आहे. निवडणूक
प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने पार पडावी या उद्देशाने राज्य निवडणूक
आयोगाने ट्रू ओटर अँप (True Voter app) आणि सिटीझन ऑन पेट्रोल (Citizens on Patrol-COP) हे मोबाईल अँप बनविले आहेत.
ट्रू ओटर अँप :
मतदारांचा विधानसभा, यादी भाग अनुक्रमांक, स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्रभाग, मतदान केंद्र व मतदान केंद्राचा पत्ता याचा शोध घेणे, मतदान केंद्रनिहाय मतदार यादी पाहणे, मतदानाबाबतची माहिती घेणे, स्वत:ची माहिती फोटोसहित अद्ययावत करणे, सोबत आधार तसेच मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी अद्ययावत करणे, कुटूंब व मित्रांचा गट तयार करणे, गैरहजर, स्थलांतरीत, मयत व बोगस मतदारांना चिन्हांकित करुन कळविणे, स्वत:चे मत सिक्युरिटी प्रश्नाद्वारे सुरक्षित करणे, आपत्कालीन परिस्थितीत तातडीने दूरध्वनी क्रमांक जतन करणे, एकाच मोबाईलद्वारे अनेक मतदारांची नोंदणी करता येणे शक्य आहे, निवडणुकीचा निकाल पाहणे हे या अँपद्वारे करता येईल.
सिटीझन ऑन पेट्रोल : (Citizens on
Patrol-COP)
- “कॉप” चा मुख्य उद्देश हा निवडणूक
प्रचारातील गैर गोष्टींना आळा घालणे हा आहे.
- आचारसंहिता
भंगाच्या तक्रारी नागरीक सुलभपणे दाखल करु शकतील.
- अँपच्या
माध्यमातून सूज्ञ जनता उमेदवारांच्या आणि राजकीय पक्षांच्या निवडणुकीतील
प्रत्येक हालचालीवर नजर ठेऊ शकतात. काहीही गैर आढळल्यास छायाचित्रासह त्याची
तत्काळ तक्रार नोंदवू शकतात.
- अँपच्या
माध्यमातून आचारसंहिता भंगाच्या तक्रारीवरील कारवाईचा रिस्पॉन्स टाईम अत्यंत
कमी करता येईल. तसेच तक्रारदाराची माहिती गुप्त ठेवता येईल. झालेल्या कारवाईचा अहवाल देखील तक्रारदारास अँपमार्फत दिसून येईल.
होत असलेल्या गैरप्रकाराची तक्रार (छायाचित्रासह) जनतेला नोंदविता येईल.
निवडणूक सनियंत्रण समिती या तक्रारीच्या आधारे कार्यवाही करेल.
Source: GOM
No comments:
Post a Comment