Showing posts with label International Relations. Show all posts
Showing posts with label International Relations. Show all posts

Sunday, 29 November 2015

युनेस्को फेलिनी पदक पुरस्कार भारतात प्रथमच इफ्फीत देण्यात येणार


युनेस्को फेलिनी पदक ४६ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) येथे चित्रपट, दूरदर्शन आणि ऑडिओ व्हिज्युअल कम्युनिकेशन यासाठीची आंतरराष्ट्रीय परिषद (ICFT), पॅरिस या संस्थेच्या सहकार्याने भारतात प्रथमच पुरस्कार देण्यात येणार आहे.
  • युनेस्को फेलिनी पदक युनेस्कोचे आदर्श प्रतिबिंबित करणाऱ्या चित्रपटाला दिले जाते.
  • फेलिनी पदकाचे पहिल्यांदा १९९५ मध्ये कान चित्रपट महोत्सवात अनावरण करण्यात आले.
  • पदकाचे दुहेरी महत्व आहे -
  • इटालियन दिग्दर्शक फेदेरिको फेलिनी यांचे चित्रपट आणि कला क्षेत्रातील योगदान आणि चित्रपट जन्माचे शंभरी साजरी करण्यासाठी १९९५ पासून (१८९५-१९९५) हा पुरस्कार देण्यात येतो.

युनेस्को
युनेस्कोचे घोषवाक्य-   "पुरुष आणि महिलांच्या मनात शांतता निर्माण करणे"  (Building peace in the minds of men and women)
युनेस्को युनायटेड नेशन्सची  "बौद्धिक" एजन्सी म्हणून ओळखले जाते.


Saturday, 28 November 2015

बराक ८ क्षेपणास्त्राचे यशस्वी उड्डाण

इस्राएल एरोस्पेस इंडस्ट्रीज आणि डीआरडीओ यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित लांब पल्ल्याचे जमिनीवरून हवेत मारा करणारे बराक ८ हवाई क्षेपणास्त्राने (Long Range Surface to Air Missile-LRSAM) यशस्वीरित्या इस्रायली नौदलाच्या चाचणी प्लॅटफॉर्मवरून उड्डाण केले.
बराक ८ क्षेपणास्त्र बद्दल-
  • LRSAM ला इस्राएलमध्ये  बराक ८ क्षेपणास्त्र देखील म्हटले जाते. हिब्रू भाषेत याचा अर्थ विजा असा होतो.
  • बराक- ८ हे बराक क्षेपणास्त्राचे विकसित रूप असून ते हेलिकॉप्टर, विमान, ड्रोन किंवा  क्षेपणास्त्र हल्ल्यात नौसेनेचे संरक्षण करण्यासाठी विकसित करण्यात आले आहे.
  • क्षेपणास्त्रची दोन्ही समुद्रातून मारा करणारी आणि जमीन आधारित आवृत्ती अस्तित्वात आहे.



Sunday, 25 October 2015

भारत-आफ्रिका शिखर परिषद

भारत-आफ्रिका शिखर परिषद काय आहे?
  • भारताचे पंतप्रधान हे २००८ सालापासून आफ्रिकन देशातील नेत्यांबरोबर एक उच्च स्तरीय बैठकीचे आयोजन करत आहेत. 
  • भारत आणि आफ्रिकेत आलटून पालटून दर तीन वर्षांनी परिषदेचे आयोजन करण्याचे निर्णय घेण्यात आला. 
  • नवी दिल्लीत २००८ साली पहिल्या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते तर २०११ साली आडिस अबाबा येथे दुसरया परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. 
  • २०१४ मधील एबोलाच्या उद्रेकामुळे परिषद पुढे ढकलण्यात आली होती. आणि आता ती २६ ते ३०ऑक्टोबर दरम्यान दिल्लीत आयोजित केली जाते आहे.


कोणते देश यात सहभागी होणार ?
भारताने आफ्रिका खंडातील सर्व ५४ देशांच्या प्रमुखांना निमंत्रित केले आहे. २००८ मध्ये पहिल्या भारत-आफ्रिका शिखर परिषदेला १४ आफ्रिकन देशांना आमंत्रित केले होते तर २०११ मधील दुसऱ्या शिखर परिषदेत १५ आफ्रिकन देशांनी हजेरी लावली. 

भारत अशा परिषदेचे आयोजन का करतोय?

भारताचे आफ्रिकन देशांशी राजकीय, आर्थिक तसेच मोक्याचे (strategic) हितसंबंध आहेत. आफ्रिकन देश विविध संसाधनांनी श्रीमंत आहेत. आफ्रिका खंडातील बरेचसे देश आर्थिक प्रगती पथावर आहेत. जागतिक दहशतवाद आणि हिंदी महासागरातला चेचेगीरीचा प्रश्न असेल भारत आणि आफ्रिकन देश एकाच पानावर आहेत. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या कायम सदस्य होण्याची भारतीय महत्वाकांक्षा असून ५४ देशांची इतकी मोठी परिषद त्यासाठी पाठींबा मिळवण्यासाठीएक मोठे व्यासपीठ आहे.

Wednesday, 21 October 2015

अणुअपघाताप्रसंगी नागरी नुकसानभरपाईच्या कायदा


अणुअपघाताप्रसंगी नागरी नुकसानभरपाईच्या  कायदा (CIVIL NUCLEAR LIABILITY DEMAND ACTसीएनएलडी)
  • भारत आणि युनायटेड स्टेट्स या दोन्ही देशात नागरी अणू उर्जेच्या वापरासंबंधित विषयांवर एकमत झाल्यावर सप्टेंबर २००८ दोघात द्विपक्षीय १२३ करार/ अमेरिका-भारत नागरी अणू सहकार्य करार मंजूर करण्यात आला. या करारामुळे भारताला आंतरराष्ट्रीय सहकार्याने अणुभट्ट्या उभारण्यासाठी व्यावसायिक वाटाघाटी करण्यासाठी परवानगी मिळाली.
  • तदनंतर, आण्विक अपघात भरपाई कायदा/ अणुअपघाताप्रसंगी नागरी नुकसानभरपाईचा कायदा २०१० साली संसदेने पारित केला. आण्विक दुर्घटना घडल्यानंतर उद्भवणाऱ्या नुकसान भरपाईची यंत्रणा व अपघाताची जबाबदारी निश्चितीसाठी हा कायदा पारित करण्यात आला आहे.
  •  सीएनएलडी कायदा (२०१०) मधील एका कलमानुसार अणुऊर्जा प्रकल्पाच्या चालकांना अपघातप्रसंगी प्रकल्पाच्या उभारणीत तंत्रज्ञान व सामग्री पुरविणाऱ्या कंत्राटदारांवर खटला चालविण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
  •  या वादग्रस्त कलमामुळे बहुतेक आंतरराष्ट्रीय कंपनींनी भारतात अणुउर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्यास असमर्थता दर्शवली आहे.
  • केंद्र सरकारने यावर उपाय म्हणून ,५०० कोटी रुपयांचा विमा कोष तयार केला असून, जेणेकरून अपघातप्रसंगी विदेशी अणुतंत्रज्ञान पुरवठादारावरील आर्थिक ताण त्यातून हलका होईल



Team MPSC Insights