Showing posts with label Sport. Show all posts
Showing posts with label Sport. Show all posts

Sunday, 7 February 2016

12 व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेला गुवाहाटी येथे सुरुवात

12 व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेला गुवाहाटी येथे सुरुवात
  • स्पर्धा  संयुक्तपणे गुवाहाटी आणि मेघालयची राजधानी शिलाँग येथे आयोजित केल्या जात आहेत.
  • भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, नेपाळ, भूतान आणि मालदीव या ८ सार्क राष्ट्रातील सुमारे २५०० खेळाडू सहभागी झाले आहेत.
  • स्पर्धेचे घोषवाक्य : 'शांती, प्रगती आणि समृद्धीसाठी खेळा
  • अधिकृत शुभंकर (mascot) - तीखोर- आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आढळणारे एकशिंगी गेंडा

दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेबद्दल
  • स्पर्धा ८ दक्षिण आशियाई (सार्क) देशांमधिल खेळाडूत आयोजित केली जाते. 
  • स्पर्धा सर्वप्रथम १९८४ साली काठमांडू नेपाल येथे आयोजित करण्यात आली होती. तद्नंतर काही अपवाद वगळता दर २ वर्षांनी स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.
  • भारताने याआधी  दोन वेळा  प्रथम कोलकाता (पश्चिम बंगाल) १९८७, आणि आणि दुसऱ्यांदा १९९५ मध्ये चेन्नई (तमिळनाडू) येथे आयोजित करण्यात आल्या होत्या.



Friday, 27 November 2015

अंजू बॉबी जॉर्ज यांची TOPS च्या अध्यक्षपदी नियुक्ती

माजी लांब उडी चॅम्पियन अंजू बॉबी जॉर्ज यांची  लक्ष्य ऑलिम्पिक व्यासपीठ योजनेची  (Target Olympic Podium Scheme-TOPS) अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 
लक्ष्य ऑलिम्पिक व्यासपीठ योजनेबद्दल
  • लक्ष्य ऑलिम्पिक व्यासपीठ योजना (TOPS ) राष्ट्रीय क्रीडा विकास निधी (National Sports Development Fund-NSDF) अंतर्गत २०१६ आणि २०२० सालच्या ऑलिंपिक स्पर्धेत संभाव्य पदक विजेत्या खेळाडूंचा शोध घेणे व त्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी तयार करण्यात आली आहे.
  • या योजनेअंतर्गत ऍथलेटिक्स, तिरंदाजी, बॅडमिंटन, बॉक्सिंग, कुस्ती आणि नेमबाजी ह्या खेळांवर लक्ष्य केंद्रित केले आहे.
राष्ट्रीय क्रीडा विकास निधी (NSDF)
  • राष्ट्रीय क्रीडा विकास निधीची  (NSDF) १९९८  मध्ये युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाद्वारे  स्थापना करण्यात आली.
  • गैर-सरकारी संसाधने ज्यात खाजगी / सार्वजनिक क्षेत्राचाही समावेश असेल आणि अनिवासी भारतीय यांच्याकडून मिळणाऱ्या संसाधनांच्या सहाय्याने देशातील खेळ आणि खेळांचा प्रसार या उद्देशाने स्थापना करण्यात आली.
  • NSDF अंतर्गत उपलब्ध निधी प्रामुख्याने प्रमुख आंतरराष्ट्रीय पदक मिळविण्याची संभावना असलेल्या खेळाडूंना सरकारने पूरक मदत म्हणून वापरला जातो.
  • त्यांच्या विशिष्ट प्रशिक्षणाची  आवश्यकता भागविण्यासाठी देशात आणि परदेशात आणि वैज्ञानिक आधार असलेली प्रशिक्षणाची तरतूद, उपकरणे खरेदी तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग इ. साठी या निधीचा वापर करण्यात येतो. 


Saturday, 14 November 2015

राजीव गांधी खेलरत्न अभियान

राजीव गांधी खेलरत्न अभियान (RGKA) ही एक केंद्र पुरस्कृत योजना आहे. ती पूर्वीच्या पंचायत युवा क्रीडा और खेल अभियान (PYKKA) योजनेच्या  जागी २०१४ मध्ये सुरू करण्यात आली

योजनेची उद्दिष्ट आहेत :
ग्रामीण तरुणांमध्ये असलेल्या उपलब्ध आणि संभाव्य क्रीडा प्रतिभेला प्रोत्साहन देणे आणि त्यासाठी तालूका (ब्लॉक) पातळीवर एक स्पर्धेचे आयोजन करणे.

या योजनेअंतर्गत महत्वाच्या तरतुदी:

  • दोन्ही आंतर आणि बाह्य क्रीडा प्रकारांसाठी (outdoor and indoor sports disciplines) देशातील प्रत्येक ब्लॉक मध्ये सहा ते सात एकर जागेवर १.६ करोड रुपये खर्च करून एक क्रीडा संकुलाचे बांधकाम करणे. (बाह्य आंतर क्रीडा क्रीडांगण बांधणीसाठी आणि आंतर क्रीडेसाठीच्या खेळांसाठी असलेल्या संकुलासाठी प्रत्येकी ८० लाख रुपये)
  • क्रीडा उपकरणासाठी १५ लाख रुपये रु. आणि  फर्निचरसाठी  १.५  लाख क्रीडा विभागाकडून  प्रदान करण्यात येतील.

योजनेच्या अंतर्गत ब्लॉक, जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवर खालील क्रीडा स्पर्धा घेण्यात येतील.
  • ग्रामीण क्रीडा स्पर्धा
  • केवळ महिलांसाठी क्रीडा स्पर्धा
  • ईशान्य भारतातील खेळ स्पर्धा
  • नक्षल प्रभावित भागात क्रीडा स्पर्धा

Tuesday, 3 November 2015

लिओनेल मेस्सी टाटा मोटर्सचा जागतिक ब्रँड अॅम्बेसिडर

चार वेळा जागतिक सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूचा मान मिळवणारा अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीची भारतीय कंपनी टाटा मोटर्सचा जागतिक ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आली आहे.
  • टाटा मोटर्सने कंपनीच्या प्रवासी वाहनांच्या प्रसिद्धीसाठी मेस्सीची निवड केली आहे.
  • जागतिक कीर्तीचा फुटबॉलपटू असलेला मेस्सी प्रथमच एका भारतीय ब्रँडची जाहीरात करणार आहे.
  • फुटबॉल व मेस्सी यांचा तरुणाईशी असलेला संबंध लक्षात घेऊन जागतिक पातळीवर तरूणांना उत्पादनांकडे आकर्षित करण्याचा कंपनीचा मुख्य उद्देश आहे.
  • टाटा मोटर्सने मेस्सीसोबत दोन वर्ष मुदतीचा करार केला आहे.

लिओनेल मेस्सी
  • लिओनेल मेस्सी हा स्पॅनिश फुटबॉल क्लब बार्सिलोना आणि अर्जेंटिनाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ यांच्या तर्फे फुटबॉल खेळणारा एक अर्जेंटाईन खेळाडू आहे.
  • जगातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून त्याची गणती केली जाते. 
  • फुटबॉल इतिहासात सलग चार वेळा फिफा बल्लोन डीओर (Fifa Ballon d'Or) हा वर्षातील सर्वोत्तम कामगिरीसाठी देण्यात येणारा पुरस्कार जिंकणारा तो एकमेव असा खेळाडू आहे.
  • तीन युरोपियन गोल्डन शूज जिंकणारा तो पहिला खेळाडू आहे.

Tuesday, 27 October 2015

भारताच्या अभिषेक वर्मा आणि दीपिकाकुमारीची रौप्यभरारी









मेक्सिको येथे सुरु असलेल्या जागतिक तिरंदाजी विश्वचषकात भारताच्या अभिषेक वर्मा आणि दीपिकाकुमारी यांनी पुरुष आणि महिला एकेरी तिरंदाजी या प्रकारात रौप्यपदक पटकावले.

दीपिकाकुमारी:  गेल्या पाच वर्षांतील दीपिकाचे हे चौथे पदक आहे.
दीपिकाने याआधी इस्तंबुल (२०११), टोकियो (२०१२) व पॅरिस (२०१३) येथे झालेल्या विश्वचषकात रौप्यपदक जिंकले आहे.

अभिषेक वर्मा हा मान मिळवणारा पहिला भारतीय पुरुष तिरंदाज आहे.



Friday, 23 October 2015

चीनची मोबाईल कंपनी 'विवो' आयपीएलचे नवे प्रमुख स्पॉनर्स


चीनची मोबाईल कंपनी 'विवो' आयपीएलचे नवे प्रमुख स्पॉनर्स:

  • आयपीएल लीगमध्ये वाद अधिक होऊ लागल्याने शीतपेय उत्पादनातील अग्रेसर असणाऱ्या ‘पेप्सी‘ कंपनीने स्पॉन्सरशीप सोडल्यानाचा निर्णय घेतला.
  • पेप्सी‘ कंपनीने बीसीसीआयशी २०१७ पर्यंत करार केला होता. 
  • भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) स्पॉनर्स म्हणून पुढील दोन वर्षांसाठी चीनची मोबाईल कंपनी विवो हिची निवड करण्यात केली आहे. 


Team MPSC Insights