Showing posts with label Art. Show all posts
Showing posts with label Art. Show all posts

Saturday, 6 February 2016

राष्ट्रीय वारसा शहर विकास योजना

                                               राष्ट्रीय वारसा शहर विकास योजना
योजनेबद्दल थोडक्यात
  • भारत सरकारच्या शहरी विकास मंत्रालयाने, सांस्कृतिक वारसा लाभलेल्या शहरांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राष्ट्रीय वारसा शहर विकास योजना (National Heritage City Development and Augmentation Yojana- HRIDAY) सुरू केली आहे.
  • या योजनेंतर्गत आवश्यक पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी प्रयत्न करून, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक तसेच पर्यावरण सुधारणा करण्यात येतील. तसेच श्रीमंत सांस्कृतिक वारस्याचे संवर्धन आणि पर्यटक आणि यात्रेकरू यांना चांगल्या सुविधा पुरवण्यासाठी सक्षम करणे हा उद्देश आहे.
  • योजना १२ शहरांमध्ये राबविली जाणार असून त्यासाठी ५०० कोटींचा निधी मंजूर करण्यात असून खालील शहरांचा समावेश करण्यात आला आहे.
  • अजमेर, अमरावती, अमृतसर, बदामी, द्वारका, गया, कांचीपुरम, मथुरा, पुरी, वाराणसी, वेलांकांनी आणि वारंगल.

Tuesday, 22 December 2015

दिलीप कुमार यांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान

प्रसिध्द अभिनेते दिलीप कुमार यांना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • पेशावर मध्ये मुहम्मद युसुफ खान या नावाने जन्म झालेल्या, दिलीप कुमार यांनी  बॉम्बे टॉकीज निर्मीत ज्वार भाट या चित्रपटाद्वारे १९४४ मध्ये एक अभिनेता म्हणून पदार्पण केले.
  • सहा दशकांपेक्षा अधिक काळ असलेल्या काराकीर्तीत त्यांनी विविध शैलीच्या भूमिका केल्यात. अंदाज  (१९४९), आन (१९५२), देवदास (१९५५), आझाद  (१९५५), मुघल-ए-आझम (१९६०) व गंगा जमुना (१९६१)
  • भारत सरकारने दिलीपकुमार यांनी भारतीय सिनेमाला दिलेल्या आपल्या असामान्य व प्रतिष्ठीत योगदानाबद्दल, १९९१ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने, १९९४ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार आणि यंदा पद्मविभूषण पुरस्काराने सम्मानित करून  गौरव केला आहे.

पद्मविभूषण:
  • देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक पुरस्कार आहे. या पुरस्कारांची सुरुवात १९५४ साली करण्यात आली. पद्मविभूषण हा दुसऱ्या क्रमांकाचा नागरी पुरस्कार आहे. खालील क्षेत्रात अपवादात्मक व प्रतिष्ठीत सेवा देणाऱ्यांना ह्या पुरस्काराने सम्मानित करण्यात येते.
  • कला, सामाजिक कार्य, सार्वजनिक व्यवहार, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, औषध, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, नागरी सेवा इ.


Sunday, 29 November 2015

युनेस्को फेलिनी पदक पुरस्कार भारतात प्रथमच इफ्फीत देण्यात येणार


युनेस्को फेलिनी पदक ४६ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) येथे चित्रपट, दूरदर्शन आणि ऑडिओ व्हिज्युअल कम्युनिकेशन यासाठीची आंतरराष्ट्रीय परिषद (ICFT), पॅरिस या संस्थेच्या सहकार्याने भारतात प्रथमच पुरस्कार देण्यात येणार आहे.
  • युनेस्को फेलिनी पदक युनेस्कोचे आदर्श प्रतिबिंबित करणाऱ्या चित्रपटाला दिले जाते.
  • फेलिनी पदकाचे पहिल्यांदा १९९५ मध्ये कान चित्रपट महोत्सवात अनावरण करण्यात आले.
  • पदकाचे दुहेरी महत्व आहे -
  • इटालियन दिग्दर्शक फेदेरिको फेलिनी यांचे चित्रपट आणि कला क्षेत्रातील योगदान आणि चित्रपट जन्माचे शंभरी साजरी करण्यासाठी १९९५ पासून (१८९५-१९९५) हा पुरस्कार देण्यात येतो.

युनेस्को
युनेस्कोचे घोषवाक्य-   "पुरुष आणि महिलांच्या मनात शांतता निर्माण करणे"  (Building peace in the minds of men and women)
युनेस्को युनायटेड नेशन्सची  "बौद्धिक" एजन्सी म्हणून ओळखले जाते.


Thursday, 29 October 2015

ए.आर. रेहमान यांना २०१५ सालचा हृदयनाथ मंगेशकर पुरस्कार

ऑस्कर विजेत्या संगीतकार ए.आर. रेहमान यांना प्रतिष्ठित हृदयनाथ मंगेशकर पुरस्कार २०१५ मुंबईत प्रसिद्ध हिंदी चित्रपट दिग्दर्शक सुभाष घई यांच्या हस्ते  देण्यात आला.
भारतीय संगीताला दिलेल्या योगदानासाठी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या ७८ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने गौरवण्यात आले.
रेहमान यांनी २००९ साली प्रदर्शित डॅनी बॉयल यांच्या 'स्लमडॉग मिलिओनर' साठी, सर्वोत्कृष्ट गाण्याचे ऑस्कर जिंकले आहे.

हृदयनाथ मंगेशकर पुरस्काराबद्दल:
  • संगीतकार आणि गायक हृदयनाथ मंगेशकर यांच्या सन्मानार्थ  मुंबई आधारित सामाजिक-सांस्कृतिक संस्था हृदयनाथ कलाकेंद्र यांकडून २०११ साली या पुरस्काराची स्थापना केली गेली.
  • हृदयनाथ हे  प्रसिद्ध संगीतकार मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचे चिरंजीव आहेत  आणि भारतीय संगीतातील प्रख्यात गायिका लता मंगेशकर आणि आशा भोसले यांचे धाकटे बंधू होत.

Saturday, 24 October 2015

रेणुका देवी महाराष्ट्रातील एक शक्तीपीठ

आदिशक्ती, आदिमाया, महापतिव्रता रेणुका देवीचे स्थान कर्नाटक राज्यातील “सौदत्ती” येथे आहे. महाराष्ट्रातील भाविक या देवीला रेणुका देवी असे म्हणतात, तर कर्नाटकातील “यल्लमा” असे म्हणतात. महाराष्ट्राच्या सीमाभागाजवळील कर्नाटकातल्या सौंदत्ती गावी एका डोंगरावर देवीचे मंदिर आहे. 
शक्तीदेवीच्या ५२ पीठांपैकी महाराष्ट्रात साडेतीन पीठ आहेत.
Ø  तुळजापूर येथील तुळजाभवानी,
Ø  कोल्हापूर येथील महालक्ष्मी
Ø  नांदेड जवळ माहूरची रेणुका देवी
Ø  चौथे अर्धपीठ नाशिकजवळील सप्तशृंगी. 

Friday, 23 October 2015

गंगाराम गवाणकर यांची मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी निवड


गंगाराम गवाणकर यांची ९६व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी निवड
  • मराठी रंगभूमीवर इतिहास घडवणाऱ्या आणि मालवणी बोली सातासमुद्रापार नेणाऱ्या ‘वस्त्रहरण’ नाटकाचे लेखक म्हणून गवाणकर सर्वांना परिचित आहेत.
  • गवाणकरांची व्यावसायिक रंगमंचावरील प्रसिद्ध नाटके :  वेडी माणसे, दोघी, वस्त्रहरण, प्रीतीगंध, चित्रागंदा, वन रूम किचन, वात्रट मेले, वर भेटू नका, पोलिस तपास चालू आहे, वर परीक्षा, अरे बाप रे, महानायक, वडाची साल पिंपळाक, भोळा डांबिस, मेलो डोळो मारून गेलो.
  • सातारा शहराला हे संमेलन भरवण्याची संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
  • ९५ वे नाटय़ संमेलन ज्येष्ठ अभिनेत्री फैय्याज यांच्या अध्यक्षतेखाली बेळगाव येथे ३०, ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी या कालावधीत भरवण्यात आले होते.


Team MPSC Insights