Friday, 4 December 2015

देशात महाराष्ट्र राज्याची सर्वात मोठी अर्थव्यवस्था : ब्रिकवर्क अहवाल

क्रेडिट रेटिंग एजन्सी ब्रिकवर्कने नुकत्याच प्रदर्शित केलेल्या अहवालानुसार, महाराष्ट्र राज्य भारतात सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून घोषित करण्यात आली   आहे.
महाराष्ट्राचे  स्थूल राज्यांतर्गत उत्पादन (जीएसडीपी) सर्वाधीक १६.८७ लाख कोटी रुपये असून त्यानंतर तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश या राज्यांचा नंबर लागतो.
अहवालातील काही ठळक मुद्दे
  • महाराष्ट्र राज्याचा जीएसडीपी आर्थिक वर्ष २०१४-१५ मध्ये ११.६९ टक्क्यानी वाढलेला आहे. मोठ्या राज्यांमध्ये महाराष्ट्रात  सर्वाधिक अंदाजे ७० टक्के  कर महसूली मिळकतीतून गोळा केला जातो.  
  • आर्थिक वर्ष २०१४-१५ मध्ये, १) गुजरात आणि २) महाराष्ट्र राज्याच्या उत्पादन क्षेत्राचा वाटा अनुक्रमे जीएसडीपीच्या २७.२६ टक्के आणि २५. ८ टक्के इतक्या प्रमाणात आहे. ३) तामिळनाडूत (१९.१%) ४) झारखंड (१८.८%) ५) हरयाणा (१८.१%).
  • सेवा क्षेत्रातील कामागरीत कर्नाटक राज्य भारतात अग्रेसर आहे. २) तामिळनाडू ३) महाराष्ट्र ४) आंध्र प्रदेश यांचा क्रमांक लागतो.
  • भारतात सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्था : १) बिहार (१७.०६%) २) मध्य प्रदेश (१६.८६%) ३) गोवा (१६.४३%)
  • भारतात सर्वाधिक धीम्या गतीने वाढणाऱ्या अर्थव्यवस्था : १) तेलंगणा (५.३%) २) पंजाब (१०.१६%) ३)  राजस्थान (११%)
  • महाराष्टाचा बालमृत्यू दर २५ असून तो राष्ट्रीय सरासरी ५० च्या अर्धा आहे. 
  • कृषी क्षेत्राचा सर्वाधिक वाटा असणारी पहिल्या पाच राज्यांमध्ये पंजाब, मध्य प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल यांचा समावेश होतो.
  • राज्यांच्या एकूण खर्चात सर्वाधिक खर्च सामाजिक सेवांच्या दिशेने ४३ टक्के, आर्थिक सेवा २२ टक्के आणि सामान्य सेवेंसाठी २३% खर्च केले जातात.  

केंद्र सरकारतर्फे उच्च शिक्षणाला चालना देण्यासाठी ज्ञान योजना (GIAN Scheme) सुरू

मानव संसाधन विकास मंत्रालयाने (मनुष्यबळ विकास) भारतातील उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेला चालना देण्यासाठी ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑफ अकॅडेमीक नेटवर्क- ज्ञान ही योजना (Global Initiative of Academic Networks) सुरू केली आहे.
ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑफ अकॅडेमीक नेटवर्क योजनेबद्दल-
  • योजनेअन्तर्गत आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या माध्यमातून देशातील उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारण्याचे उद्दिष्ट आहे.
  • उच्च दर्जाच्या आंतरराष्ट्रीय शिक्षणतज्ज्ञ यांच्या सहभागाने भारतीय शिक्षण संस्थामध्ये अल्पकालीन अभ्यासक्रम आणि कार्यक्रम यांचे आयोजन करणे.
  • सुरुवातीला ५०० आंतरराष्ट्रीय प्राध्यापकांना या आयोजित अभ्यासक्रमात सहभागी होतील आणि त्यानंतरच्या वर्षांमध्ये १००० प्राध्यापकांना  भारतभर ज्ञान योजनेअंतर्गत गुंतवले जाईल.
  • अभ्यासक्रमांचा कालावधी विषयानुसार एक ते तीन आठवडे  इतका असेल आणि यजमान संस्थेतील विद्यार्थ्यांना मोफत आणि इतरांना नाममात्र शुल्कासहित उपलब्ध असेल.
  • हे अभ्यासक्रम आयआयटी खरगपूरने तयार केलेल्या वेब पोर्टल www.gian.iitkgp.ac.in माध्यमातून देशभरात विद्यार्थ्यांपर्यंत  थेट पोहचविले जाईल.

Thursday, 3 December 2015

MPSC Insights QUIZ 6 ANSWERS

1.    अलीकडेच  युनायटेड नेशन्सने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार प्रत्येक वर्षी कुठल्या प्रदूषणामुळे लाखो लोकांचा अकाली मृत्यू होतो असा उल्लेख केलेला आहे?
A. जलप्रदूषण
B. भू-प्रदूषण
C. हवा-प्रदूषण
D. थर्मल प्रदूषण
हवा-प्रदूषण
2.    प्रथम दिवस-रात्र कसोटी सामना अॅडलेड येथे २७ नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू झाला. यात वापरल्या जाणाऱ्या चेंडूचा रंग कोणाता आहे?  
A.  गुलाबी
B.  जांभळा
C.  पिवळा
D.  लाल
गुलाबी
3.    २७ नोव्हेंबर २०१५ रोजी पहिल्यांदाच इस्रायली नौदलाच्या प्लॅटफॉर्मवरून यशस्वीरित्या उड्डाण चाचणी करण्यात आलेल्या लांब पल्ल्याचे जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रचे नाव?
A  धनुष क्षेपणास्त्र
ब) बराक -८
क) पृथ्वी २
ड) अग्नी १
बराक -८

4.    कोणत्या संस्थेने २०१५ सर्वाधिक तापमान असलेले वर्ष म्हणून नुकतेच घोषित केले आहे?
A. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम
B. जागतिक आरोग्य संघटना
C जागतिक पर्यटन संघटना
D.जागतिक हवामान संघटना
जागतिक हवामान संघटना
5.    भारत सरकारने ८ वर्ष कालावधी असलेले गोल्ड बाँड जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत किमान किती ग्रॅम किमतीचे बाँड घेणे अनिवार्य आहे?
A. १ ग्रॅम
B. ४ ग्रॅम
C. २ ग्रॅम
D. ५ ग्रॅम
२ ग्रॅम
6.    भारतातील कुठल्या राज्यात एप्रिल २०१६ पासून दारू विक्रीवर बंदी घालण्यात येणार आहे?
A. तामिळनाडू
B. केरळ
C. बिहार
D. हरियाणा
बिहार
7.    खालीलपैकी कुठल्या बँकेने कमी उत्पन्न असणाऱ्या राज्यांना मदत करण्यासाठी नीव नावाचा निधी सुरू केला आहे?
A. आयसीआयसीआय बँक
B. अॅक्सिस बँक
C. एसबीआय
D. यापैकी नाही
एसबीआय - या निधीचा वापर, पाणी आणि स्वच्छता, स्वच्छ ऊर्जा आणि शहरी क्षेत्रातील लहान पायाभूत सुविधा विकास इत्यादीसाठी करण्यात येणार आहे.
8.    महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अंतर्गत प्रत्येक शेतक-याला किती किमतीचे  वार्षिक विमा संरक्षण मिळणार आहे?
A.Rs १ लाख
B.Rs १.५ लाख
C.Rs ३ लाख
D.Rs २ लाख
Rs २ लाख
9.    टार्गेट ऑलिम्पिक पोडीअम योजनेच्या  (TOPS) अध्यक्षपदी खालील कोणत्या खेळाडूला नियुक्त केले आहे?
A. इंदरजित  सिंग
B. अंजू बॉबी जॉर्ज
C.अभिनव बिंद्रा
D. अनुराग ठाकूर
अंजू बॉबी जॉर्ज
10. भारत सरकारने कुणासाठी सुगम्य भारत अभियान सुरु केले आहे?
A. वृद्ध व्यक्तिंसाठी
B. अपंग व्यक्तिंसाठी
C. अंध व्यक्तींसाठी
D. विधवा महिलांसाठी
अपंग व्यक्तिंसाठी




Wednesday, 2 December 2015

आंतरराष्ट्रीय सौर युती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  पॅरिस हवामान बदल परिषदेत  आंतरराष्ट्रीय सौर युती (International Solar Alliance- ISA) या उपक्रमाची सुरूवात  केली आहे.
उपक्रमाची सुरुवात पॅरिस येथे सुरु असलेल्या सीओपी २१ (CoP21) हवामान परिषदेत करण्यात आली.
आंतरराष्ट्रीय सौर युतीबद्दल
  • या आंतरराष्ट्रीय उपक्रमाद्वारे विविध  १२० विकसित व विकसनशील देशांना एकत्र आणून स्वच्छ, स्वस्त आणि अक्षय सौर ऊर्जा वापर वाढवून आर्थिक विकासाला उत्तेजन दिले जाईल.  
  • उपक्रमाचे भारतातील राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्था, गुडगाव मधून व्यवस्थापन केले जाणार आहे.
  • सौर उर्जेचा मोठ्या प्रमाणावर वापर होण्यासाठी सौर उर्जा तंत्रज्ञान खर्च कमी करणे. 
  • प्रशिक्षणात सहकार्य, विविध संस्थांची उभारणी, नियामक संस्था, समान मानके तसेच गुंतवणूक सहकार्याद्वारे सौर उर्जेला प्रोत्साहन देणे.





Team MPSC Insights