- सूक्ष्म,लहान आणि मध्यम उद्योगांसाठी अभिनव कर्ज योजना आहे. ही योजना भारत लघु उद्योग विकास बँकेद्वारे राबवली जाणार असून ती सूक्ष्म,लहान आणि मध्यम उद्योगाच्या जाहिरातीसाठी, आर्थिक वृद्धीसाठी आणि विकासासाठी सुरु करण्यात आली आहे.
- मेक इन इंडिया अंतर्गत लक्ष केंद्रीत केलेल्या २५ क्षेत्रातील सूक्ष्म,लहान आणि मध्यम उद्योगांना प्राधान्य देण्यात येईल.
- केंद्रीय अर्थसंकल्पात या योजनेसाठी १०००० करोड रुपयांची तरतूद केली आहे.
सिडबी मेक इन इंडिया लोन फ़ॉर स्मॉल
इंटरप्रायसेस (SIDBI Make in India
Loan for Small Enterprises - SMILE Scheme) योजना :
- सिडबी
बँकेची निर्मिती लघु क्षेत्रातील उद्योगांच्या जाहिरात, आर्थिक आणि विकासासाठी सर्वोच्च संस्था म्हणून
आणि तत्सम कार्यात गुंतलेल्या इतर संस्थाच्या समन्वयासाठी
संसदेच्या एका अधिनियमाद्वारे करण्यात आली.
- १९९० साली
बँकेने आपले काम सुरु केले.
- सिडबी अखिल भारतीय स्तरावर लहान उद्योगांना प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष आर्थिक मदत करण्याचे कार्य करते.
- नवीन प्रकल्पांचा विस्तार , प्रकल्पांच्या आधुनिकीकरानाबरोबर अद्ययावत तंत्रज्ञान व गुणवत्ता सुधारणा , लघु उद्योग युनिट विपणन क्षमता, निर्यातीसाठी जाहिरातीसाठी मदत यासाठी बँकेकडून मदत केली जाते.
सिडबी बँक:

No comments:
Post a Comment