Monday, 23 November 2015

MPSC Insights QUIZ 5

MPSC Insights QUIZ5

1.    राष्ट्रीय उत्पादन धोरण अंतर्गत सौ निर्मला सीतारामन यांनी तंत्रज्ञान संपादन आणि विकास निधी (TADF) अलीकडेच जाहीर केला आहे. कुठल्या  क्षेत्राला  यामुळे चालना मिळेल?
A. बँक
B. सूक्ष्म लघु आणि मध्यम उपक्रम (MSME)
C. दूरसंचार (Telecom)
D. माहिती व तंत्रज्ञान (IT)
2.    आंतरराष्ट्रीय दहशतवाद निर्देशांक २०१५ नुसार २०१४  साली दहशतवादाने सर्वात जास्त प्रभावित झालेल्या देशांच्या क्रमवारीत भारताचा कितवा क्रमांक लागतो?
A.१२३
B.९६
C.६
D.८
3.    भारत-रशिया दरम्यान सैन्य यांच्या दरम्यान सैन्य कसरती आणि सरावाचे ७वे पर्व अलीकडेच बिकानेर येथे पार पडले. या सराव कार्यक्रमाचे  नाव काय?
A.हातात हात (Hand-in-Hand)
B.इब्सामार
C.कोंकण
D. इंद्र
4.    वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जाहीर केलेल्या आंतरराष्ट्रीय लिंग निर्देशांक यानुसार भारताचा कितवा क्रमांक आहे? 
A.१०८
B.१२५
C.१३०
D.१०२
5.    आर्थिक व्यवहार कॅबिनेट समितीने ऊस शेतक-यांना प्रति क्विंटल किती उत्पादन अनुदान देण्याचे जाहीर केले आहे?
A.रु.  ४.७५
B.रु.  ३.५०
C.रु.  ४.५०
D.रु.  ३.७५
6.    २०१५ सालचा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार खालील कुठल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या कार्यालयाला प्रदान करण्यात येणार आहे?
A. संयुक्त राष्ट्र  हवामान बदल  फ्रेमवर्क कन्व्हेन्शन (UNFCC)
B. संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतीक संघटना (UNESCO)
C.संयुक्त राष्ट्र  शरणार्थी उच्चायुक्त (UNHCR)
D.संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संघटना (UNWTO)
7.    फ्रान्सने  दहशतवादी हल्ल्यांच्या  मालिकेनंतर तात्काळ आणीबाणी जाहीर केली आहे. फ्रान्सचे  अध्यक्ष कोण आहेत?
A. डेवीड कॅमेरॉन
B. जस्टीन त्रुदू
C. फ्रान्कीस होल्लांडे
D. टोनी टॅन
8.    कुठल्या तारखेला जागतिक मधुमेह दिन साजरा केला जातो ?
A. १२ नोव्हेंबर
B. ११नोव्हेंबर
C. १४नोव्हेंबर
D. १० नोव्हेंबर
9.    भारताचे ४३ वे  मुख्य सरन्यायाधीश म्हणून म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली?
A) न्याय.  तीर्थ सिंग ठाकूर
B)  न्याय.पी सदाशिवम
C) न्याय. व्ही. खरे
D)  न्याय. आदर्श सेन आनंद
10. १९ नोव्हेंबर २०१५  रोजी साजरा करण्यात आलेल्या जागतिक शौचालय दिवसाची घोषणा काय होती ?
अ) स्वच्छता आणि पोषण
ब) एकात्मता आणि प्रतिष्ठा जपण्यासाठी शौचालय
क) सर्वांसाठी स्वच्छता
ड) शौचालय आवश्यक आहे

 

Write your answers in comment section.... 
Answers will be provided in coming days

गुन्हे आणि क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टम प्रकल्पाच्या विस्ताराला मंजुरी

आर्थिक व्यवहार मंत्रिमंडळ समितीने गृह मंत्रालयाच्या गुन्हे आणि क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टम (Crime & Criminal Tracking Network & Systems - CCTNS) प्रकल्पाच्या विस्ताराला मंजुरी दिली असून एकात्मिक फौजदारी न्याय प्रणाली प्रकल्प  (Integrated Criminal Justice System- ICJS) राबवण्यासाठी  ई-न्यायालये,  CCTNS प्रणालीला जोडण्याचा निर्णय घेतला आहे.
  • यामुळे पारदर्शकता वाढून विविध फौजदारी न्याय प्रणाली प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीचा वेळ कमी होईल तसेच वेगवेगळ्या विभागातील माहितीच्या आदानप्रदानाला वेग प्राप्त होईल.
  • पोलीस आणि नागरिक संवा वाढणार आहे कारण या अंतर्गत विविध सेवा नागरिक पोर्टलद्वारे देण्यात येणार आहे.
CCTNS प्रकल्प:
  • गुन्हे आणि क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टम (CCTNS) प्रकल्प पोलीस स्टेशन स्तरावरील कार्यक्षमता वाढविण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर एक व्यापक आणि एकात्मिक प्रणाली निर्माण करण्यासाठी  २००९ साली सुरु करण्यात आला.
  • राज्यात आणि देशातील गुन्हेगारी आणि गुन्हेगारीविषयक माहिती शेअर करणे
  • देशभरातून तसेच विविध  राज्यांतील गुप्तचर माहितीचे एकत्रीकरण करणे.
  • गुन्ह्यांचा तपास, गुन्हेगारी प्रतिबंध, कायदा आणि सुव्यवस्था देखभाल आणि वाहतूक व्यवस्थापन साधने यांच्यात सुधारणा करणे
  • सार्वजनिक भागधारक/नागरिक यांना सहभागी करणे व त्यांना दिल्या जाणाऱ्या सेवेत सुधारणा करणे.
  • गुन्हा संबंधित माहितीचे सोपे व जलद पण सक्षम विश्लेषण करणे.
  • पोलिसांच्या कार्यक्षमतेत वाढ करणे.

 

MPSC Insights QUIZ 4 ANSWERS

MPSC Insights QUIZ 4 ANSWERS


1.   बँकाकडे असलेल्या ठेवींना संरक्षण प्रदान करणे आणि बँकाकडील किमान ठेवींना विमा पुरवण्याचे काम कुठली संस्था करते?
डिपॉझिट इन्शुरन्स आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन  (Deposit Insurance and Credit Guarantee Corporation-DICGC)
2.   गुगलचे सहसंस्थापक लॅरी पेज यांनी नव्याने निर्माण केलेल्या कंपनीचे नाव काय आहे?
अल्फाबेट
3.   एनर्जी अँड रिसोर्सेस इंस्टिट्यूट (TERI)  संस्थेत काम करणाऱ्या कुठल्या हवामान शास्त्रज्ञाला संस्थेतील एका महिला कर्मचाऱ्याला मानसिक, व्यावसायिक आणि आर्थिक त्रास दिल्यामुळे राजीनामा दयावा लागला?
आर. के. पचौरी
4.   अलीकडेच जागतिक बँकेने प्रसिद्ध केलेल्या इज ऑफ डुइंग बिजनेस (Ease of Doing Business) २०१६ अहवालानुसार भारताची रँकिंग काय आहे? 
१३०
5.   सेतू (SETU) या योजनेचे पूर्ण नाव काय आहे?
Self Employed and Talent Utilization (SETU) scheme
6.   ओरिसा राज्य सरकारने कुठल्या बेटाचे नामकरण अब्दुल कलाम बेट म्हणून केले आहे?
व्हिलर बेट
7.   विविध सेवांवर स्वच्छ भारत कर किती लागू करण्यात आहे?
०.५०%
8.   कुठले चक्रीवादळ अलीकडे पश्चिम बंगाल आणि उत्तर ओडिशा किनाऱ्याला  धडकले?.
कोमेण
9.   केंद्र सरकारने अल्पसंख्याक युवकांना शैक्षणिक आणि कौशल्य प्रशिक्षणासाठी प्रायोगिक तत्त्वावर बिहारपासून कुठल्या योजनेची सुरुवात केली आहे?   
नई मंझील योजना
10.  अलीकडे झालेल्या  तिसऱ्या "मित्र शक्ती-२०१५"  सैनिकांचा संयुक्त प्रशिक्षण कार्यक्रम कुठल्या दोन देशांदरम्यान आयोजित करण्यात आला होता?
भारत आणि श्रीलंका

 

Team MPSC Insights