ऑस्कर
विजेत्या संगीतकार ए.आर. रेहमान यांना प्रतिष्ठित हृदयनाथ मंगेशकर पुरस्कार २०१५
मुंबईत प्रसिद्ध हिंदी चित्रपट दिग्दर्शक सुभाष घई यांच्या हस्ते देण्यात आला.
भारतीय
संगीताला दिलेल्या योगदानासाठी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या ७८ व्या
वाढदिवसाच्या निमित्ताने गौरवण्यात आले.
रेहमान यांनी २००९ साली प्रदर्शित डॅनी बॉयल यांच्या 'स्लमडॉग
मिलिओनर' साठी, सर्वोत्कृष्ट गाण्याचे
ऑस्कर जिंकले आहे.
हृदयनाथ
मंगेशकर पुरस्काराबद्दल:
- संगीतकार आणि गायक हृदयनाथ मंगेशकर यांच्या सन्मानार्थ मुंबई आधारित सामाजिक-सांस्कृतिक संस्था हृदयनाथ कलाकेंद्र यांकडून २०११ साली या पुरस्काराची स्थापना केली गेली.
- हृदयनाथ हे प्रसिद्ध संगीतकार मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचे चिरंजीव आहेत आणि भारतीय संगीतातील प्रख्यात गायिका लता मंगेशकर आणि आशा भोसले यांचे धाकटे बंधू होत.

No comments:
Post a Comment