Tuesday, 8 December 2015

नवीन अहवालानुसार भारतातील जंगलात वाढ

भारतीय वन सर्वेक्षणाद्वारे (FSI)  नुकत्याच प्रकाशीत द्वैवार्षिक अहवालानुसार भारतातील वन क्षेत्रात २०१३ सालच्या तुलनेत ३७७५ चौरस किलोमीटरने वाढ झाली आहे.
एफएसआय (Forest Survey of India) १९८७ पासून देशातील वन आणि झाड संसाधने यांचे नियमित मोजमाप आणि मूल्यांकन करते आणि एक द्वैवार्षिक अहवाल प्रकाशित करते.
  • विशेष म्हणजे २००७ पासून स्थिर असणाऱ्या अतिशय दाट जंगलात २४०२ चौ.किमी वाढ नोंदवली गेलेली आहे.
  • २०१५ अहवालानुसार  मुख्य वनापैकी २५११ चौरस किलोमीटर वन क्षेत्र पूर्णपणे नाहीशी झाली आहेत, तर नॉन-फॉरेस्ट भागात ११३५ चौरस किलोमीटर क्षेत्र फार दाट किंवा  दाट जंगलात रुपांतरीत  झाले आहेत, हे लक्षात येते.
  • २०१३ च्या तुलनेत २४०२ चौरस किलोमीटर अतिशय दाट वनातील वाढ प्रामुख्याने अंदमान आणि निकोबार बेटे, उत्तर प्रदेश आणि तमिळनाडू येथील सकारात्मक वाढीमुळे झाली आहे.
  • क्षेत्रफळानुसार सर्वात जास्त वनक्षेत्र असलेले राज्य

१) मध्य प्रदेश ७७४६२ चौरस किलोमीट
२) अरुणाचल प्रदेश ६७२४८ चौरस किलोमीटर
३) छत्तीसगड ५५५८६ चौरस किलोमीटर 
  • सर्वाधिक वनक्षेत्रानुसार

           १) मिझोराम (८८.९%)
           २) लक्षद्वीप (८४.६%)
  • अंदमान आणि निकोबार, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मेघालय आणि मणिपूर या राज्यात वन क्षेत्र ७५% पेक्षा अधिक आहे

महाराष्ट्र
  • अहवालानुसार महाराष्ट्रातील एकूण भौगोलिक क्षेत्राच्या २०.०१% क्षेत्र  वनांनी व्यापलेले आहे. (६१५७९ चौ.किमी/३०७७१३ चौ.किमी)
  • महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांत देशभरात सर्वाधिक खारफुटी वनांची वाढ झाली आहे.
  • अतिक्रमण आणि बिगर वनीकरण हेतूने वन भागातील फेरफार यामुळे  महाराष्ट्रातील  वनक्षेत्र कमी झाले आहे. दोन वर्षांच्या कालावधीमध्ये  फार दाट जंगल आणि मध्यम दाट जंगल मध्ये किंचित घसरण झाली आहे.
  • २०१३ सालच्या मागील आकडेवारीच्या तुलनेत महाराष्ट्रातील खुल्या जंगलात २७ चौरस किलोमीटर वाढ झाली आहे. 


No comments:

Post a Comment

Team MPSC Insights