Saturday, 24 October 2015

रक्तपेढय़ांमध्ये रक्ताचे हस्तांतर करण्यास केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची मुभा





         रक्तपेढय़ांमध्ये रक्ताचे हस्तांतर करण्यास  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मुभा दिली आहे. 
  • रक्त आणि रक्त घटकांपासून तयार केल्या जाणार्‍या जीवरक्षक औषधांची उपलब्धता वाढावी तसेच ती गरज असेल तेथे वेळेवर उपलब्ध व्हावीत यासाठी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
  • रक्तातील प्लाझ्मापासून मानवी अल्ब्युमिन, इम्युनोग्लोब्युलिन्स, रक्त गोठण्यास मदत करणारी द्रव्ये अशा प्रकारची अनेक जीवरक्षक औषधे तयार केली जातात.
  • देशातील काही रक्तपेढय़ांमध्ये प्रसंगी अतिरिक्त रक्त प्लाझ्मा उपलब्ध असतो; परंतु त्याची विल्हेवाट कशी लावावी यासाठी यापूर्वी कोणतेही नियम नसल्याने रक्तपेढय़ा अशा अतिरिक्त प्लाझ्माचा व्यापार करीत असत; मात्र आता यासाठीही निश्‍चित पद्धत ठरवून देण्यात आली आहे. यासाठी प्रति लिटर प्लाझ्मासाठी १,६०० रुपये असे अदलाबदल मूल्य निश्‍चित करण्यात आले आहे; मात्र रक्तपेढय़ा अतिरिक्त प्लाझ्मा रोखीने विकू शकणार नाहीत. प्लाझ्मा देऊन रक्तपेढय़ा त्या बदल्यात गरजेनुसार नित्यवापराची सामग्री, उपकरणे किंवा प्लाझ्मापासून तयार केलेली उत्पादने घेऊ शकतील.

राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषद
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अखत्यारीत, राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेची १९९६ मध्ये नवी दिल्ली येथे स्थापना करण्यात आली होती.
उद्दिष्टे    
१) रक्तदान करण्यास प्रोत्साहन देणे
२) सुरक्षित रक्त संक्रमण याची खात्री करणे 
 ३) रक्त केंद्रांसाठी पायाभूत सुविधा प्रदान करणे
 ४) मानव संसाधन विकसित करणे

  • देशात वैद्यकीय उपचारांसाठी रक्त देणे वा बदलण्याच्या सुरक्षित व स्थायी सेवा कशा संघटित कराव्यात याविषयीचे धोरण आखण्याचे काम ही कौन्सिल करते.
  • राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेप्रमानेच राज्य स्थरावर राज्य रक्त संक्रमण परिषदेंची स्थापना करण्यात आली आहे.




No comments:

Post a Comment

Team MPSC Insights