पीडित महिलांना मदत करण्याच्या उद्देशातून महाराष्ट्रातील पहिले निर्भया केंद्र पुण्यामध्ये होत आहे.
काय आहे निर्भया केंद्र?
- दिल्ली येथे घडलेल्या निर्भया प्रकरणानंतर पीडित महिलांना मदत करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार पीडित महिलांच्या मदतीसाठी प्रत्येक राज्यामध्ये निर्भया केंद्र (वन स्टॉप सेंटर) सुरू करण्याचे ठरविण्यात आले.
- सार्वजनिक, खाजगी ठिकाणी, कुटुंबामध्ये किंवा नोकरीच्या ठिकाणी शारीरिक, लैंगिक, मानसिक, भावनिक किंवा आर्थिक छळ झालेल्या पीडित महिलांना या केंद्राच्या माध्यमातून तातडीची मदत मिळणार आहे.
- केंद्रामार्फत वैद्यकीय साहाय्य, पोलीस तक्रार नोंदविण्यासाठी मदत, मानसिक आधार, समुपदेशन, न्यायविषयक मार्गदर्शन, तात्पुरती निवासाची सोय अशा प्रकारच्या सेवा पुरविण्यात येतील.
- २४ तास हेल्पलाइन आणि आवश्यकतेनुसार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सुविधाही केंद्रामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
- केंद्रीय अर्थसंकल्पात एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून प्रत्येक राज्यामध्ये निर्भया केंद्र सुरू करण्यात येणार आहे.
- केंद्र सरकारच्या महिला आणि बालकल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत सदर योजना राबवली जाणार आहे.
- महाराष्ट्रात या केंद्रासाठी मुंढवा येथील ‘माहेर’ या संस्थेच्या प्रकल्पाची जागा महिला बालविकास आयुक्तालयाकडे सुचविण्यात आली आहे.
- २०१३चा केंद्रीय अर्थसंकल्प मांडताना तत्कालीन अर्थमंत्री श्री. पी. चिदंबरम यांनी निर्भया फंड याची घोषणा केली होती.
- या निधीचा वापर महिलांच्या निधी या निधीचा वापर महिलांच्या प्रतिष्ठा व महिला संरक्षणाचे काम करणाऱ्या सरकारी आणि स्वयंसेवी संस्थाना मदत करण्यास केला जाईल.
- सुरुवातीस प्रत्येक जिल्ह्यात एक बलात्कार संकट केंद्र सुरु करण्याचा मानस होता परंतु नंतर सरकारने देशभरात ६५० वेगवेगळ्या ठिकाणी निर्भया केंद्रे उभारण्यासाठी निर्भया फंडाची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्प २०१५ मध्ये केली असून त्यासाठी अधिक १००० कोटी रुपयांचा निधी पुरवण्यात येणार आहे.

No comments:
Post a Comment