Thursday, 5 November 2015

बलात्कारातून जन्मलेल्या संततीलाही संपत्तीत वाटा

एखाद्या महिलेवर अत्याचार झाल्यानंतर तिने मुलास जन्म दिल्यास ते मूल अत्याचार करणाऱ्या व्यक्तीची अनौरस संतती असून, त्याचा आपल्या पित्याच्या संपत्तीवर पूर्ण अधिकार असल्याचे महत्त्वपूर्ण आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने दिले.

·         बलात्कारातून जन्मलेल्या अपत्यास कुणी दत्तक घेतले नसेल तर त्यास उत्तराधिकारासाठी न्यायालयाच्या कुठल्याही निर्देशाची गरज राहणार नाही.

·         संबंधित ‘पर्सनल लॉ’अंतर्गत बलात्कारातून जन्मलेल्या अपत्याचा त्याच्या खऱ्या पित्याच्या संपत्तीवर अधिकार असेल.

·         जर हेच मूल पुढे दुसऱ्या कुटुंबास दत्तक देण्यात आले; तर मात्र त्याचा आपल्या जैविक पित्याच्या संपत्तीवर अधिकार राहत नाही.

·         सोबतच या ‘विषम सामाजिक मुद्याशी’ निपटण्यासाठी कायदेमंडळ योग्य कायदा बनवू शकेल, असा सल्लाही न्यायालयाने यावेळी दिला.

पर्सनल लॉ

कुटुंबातील व्यवहारांच्या संबंधी विविधं प्रकरणे वैयक्तिक कायद्यांद्वारे नियंत्रित केले जातात.  कुटुंब व्यवहार म्हणजे विवाह, घटस्फोट, वारसाहक्क, इ.

भारतात विवाह आणि / किंवा घटस्फोट संबंधित कायदा यात वेगवेगळ्या धर्मानुसार विविधता आढळून येते.

हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा १८५६

भारतीय ख्रिश्चन विवाह कायदा, १८७२

काझीस  कायदा, १८८०

आनंद विवाह कायदा, १९०९

भारतीय वारसाहक्क कायदा, १९२५

बाल विवाह विरोधी कायदा, १९२९

पारशी विवाह आणि घटस्फोट कायदा, १९३६

मुस्लिम विवाह बरखास्ती कायदा १९३९

विशेष विवाह कायदा, १९५४

हिंदू विवाह कायदा, १९५५

विदेशी विवाह अधिनियम, १९६९

मुस्लिम महिला (घटस्फोट हक्कांचे संरक्षण) अधिनियम, १९८६

No comments:

Post a Comment

Team MPSC Insights