Monday, 19 October 2015

श्रीहरी अणे राज्याचे नवे महाधिवक्ता

महाराष्ट्र शासनाने ज्येष्ठ विधिज्ञ श्री श्रीहरी अणे यांची राज्याच्या महाधिवक्ता या पदावर घटनेतील कलम १६५ नुसार नेमणूक केली आहे. ते माजी महाधिवक्ता श्री सुनील मनोहर यांनी वैयक्तिक कारणांमुळे रिक्त झालेल्या पदाचा कारभार स्वीकारतील.

श्रीहरी अणे  :
·   १९५० रोजी पुणे येथे जन्मलेले अँड. अणे यांचे शालेय शिक्षण जमशेदपूर येथे झाले. तर पुणे विद्यापीठातून त्यांनी पदवी संपादन केली.
·      भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि विदर्भातील ज्येष्ठ नेते दिवंगत लोकनायक बापूजी अणे यांचे श्रीहरी हे नातू आहेत. बापूजी अणे हे घटनासभेचे सदस्य होते. तसेच ते नागपूरचे खासदार आणि बिहारचे राज्यपालदेखील होते.

कलम १६५: हे कलम महाधीवक्त्याच्या नेमणुकीबद्दल

·         राज्यापालाद्वारे नेमणूक केली जाते. त्यांची मर्जी असोपर्यन्तच या पदावर राहू शकतो.
·         उच्च न्य्यालायाच्या न्यायाधीश पदी नेमणूक होण्यासाठी लागणारी पात्रता गरजेची.
·         त्यांचे कार्य शासनाला कायदेशीर सल्ला देणे, त्याचप्रमाणे राज्यशासनाची विविध न्यायालयात बाजू मांडणे हे होय.

No comments:

Post a Comment

Team MPSC Insights