Sunday, 25 October 2015

‘जनधन’ कार्यकर्त्यांना सेवाकरातून मुक्ती

जनधनकार्यकर्त्यांना सेवाकरातून मुक्ती
प्रधानमंत्री जनधन योजना राबवण्यासाठी तसेच या योजनेचा प्रसार करून अधिकाधिक बँक खाती उघडण्यासाठी काम करणाऱ्या बँकिंग करस्पॉन्डन्टची सेवा करमुक्त ठेवण्यात आल्याची घोषणा केंद्र सरकारने केली. जनधन योजना ही सर्वसमावेशक आर्थिक विकासाला चालना देणारी असल्याने या योजनेच्या प्रसारासाठी काम करणाऱ्यांची सेवा करातून वगळण्यात आली आहे.

बँकिंग करस्पॉन्डन्टची कार्ये: 
  • प्रधानमंत्री जनधन योजना राबवण्यासाठी तसेच योजनेचा प्रसार करून अधिकाधिक बँक खाती उघडण्यासाठी काम करणे. 
  • जनधन योजनेसाठी काम करताना बँक खाते उघडून घेणे, त्या खात्यात रक्कम भरणे, खात्यातून रक्कम काढून खातेदाराला देणे, ई-लाइफ प्रमाणपत्र घेणे, ग्रामीण भागातील शाखांमध्ये ही खाती आधारसंलग्न करणे. 

प्रधानमंत्री जनधन योजना  (पीएमजेडीवाय):  ही सर्वसमावेशक आर्थिक विकास साधू पाहणारी राष्ट्रीय योजना आहे. ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट २०१४मध्ये घोषित केली आणि ती २८ ऑगस्ट २०१४मध्ये प्रत्यक्षात सुरू झाली. बँकिंग प्रणालीशी अद्याप संबंध न आलेल्या अशा प्रत्येक कुटुंबात एक तरी बँक खाते असावे या उद्देशाने जनधनअंतर्गत बँक खाती उघडण्यात येत आहेत. आतापर्यंत १८.७० कोटी बँक खाती उघडली गेली आहेत. जनधनअंतर्गत उघडण्यात येणारे बँक खाते हे बचत खात्याच्या स्वरूपात असून ते शून्य शिलकीचे खाते आहे. उघडण्यात आलेल्या जनधन खात्यांतून आतापर्यंत २५ हजार कोटी रुपयांहून अदिक रक्कम जमा झाली आहे.



No comments:

Post a Comment

Team MPSC Insights