Saturday, 24 October 2015

निवृत्ती यंत्रणेत भारताने मिळवला अंतिम क्रमांक

देशातील निवृत्ती यंत्रणेचा निर्देशांक (Global Pension Index) जागतिक पातळीवर शेवटच्या स्थानी आला आहे. 

  • 'मर्सर'  (Melbourne Mercer Global Pension Index-MMGPI) या जागतिक सल्लागार संस्थेच्या अहवालामध्ये ही बाब नोंदवण्यात आली आहे. 
  • देशाचा निर्देशांक २०१४ मध्ये ४३.५ होता. तो आता ४०.३ इतका खाली आला आहे. 
  • गृह बचत दरामध्ये घट झाल्यामुळे हा निर्देशांक घसरला असल्याचे 'मेलबोर्न मर्सर ग्लोबल पेन्शन इंडेक्स'च्या अहवालामध्ये म्हटले आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राबवलेल्या प्रधानमंत्री जन धन योजना, 'नॅशनल पेन्शन स्कीम' या योजनांमु‍ळे हा निर्देशांक वाढण्यास मदत होणार असल्याचे म्हटले आहे.
  • सलग चौथ्यांदा डेन्मार्क पहिल्या क्रमांकावर असून सर्वांत चांगली निवृत्ती यंत्रणा डेन्मार्कमध्ये आहे.

No comments:

Post a Comment

Team MPSC Insights