दर
शेती हंगामात होणारा युरियाचा काळाबाजार रोखून बळिराजासाठीची खते थेट त्याच्याच
हाती पडावीत यासाठी केंद्र सरकारने थेट शेतकऱ्यांनाच सबसिडीतील युरिया खताचा
पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शेतकऱ्यांना युरिया कार्ड किंवा कृषी
कार्ड दिले जाईल.
- पुढील हंगामापासून सुरू होणारी ही महत्त्वाकांक्षी योजना महाराष्ट्रापासून सुरू होईल व पहिल्या टप्प्यात आंध्र प्रदेशाचाही समावेश त्यात केला जाणार आहे.
कडुलिंब
(नीम) युरिया
- शेतकऱ्यांना देण्यात येणारे युरिया हे "कडुलिंब (नीम) युरिया‘ असेल, या नीम युरियामुळे शेतीचा पोत व उत्पादकता वाढते. कीटकनाशक म्हणून कार्य करते.
- रासायनिक कारखान्यांसाठी, तसेच दुधातही भेसळ करण्यासाठी प्रचंड प्रमाणात होणारा सबसिडीतील युरियाचा गैरवापर रोखला जाईल.
- अपव्यय टाळल्यामुळे जास्त युरियाच्या वापरामुळे होणारे जलप्रदूषण कमी होइल.
- युरीयावर दिल्या जाणाऱ्या अनुदानात शून्य फेरफार होणार, साधारणता युरियाला तब्बल ७५ टक्के सबसिडी मिळते, मात्र त्याचाच गैरफायदा काळाबाजारवाले व दलाल घेतात.
No comments:
Post a Comment