एसटीचा पास काढण्यासाठी २६० रुपये नसल्याने लातूरच्या स्वाती पिटले या
विद्यार्थिनीला आत्महत्या करावी लागल्याच्या दुर्दैवी घटनेची राज्य सरकारने गंभीर
दखल घेतली आहे.
- दुष्काळग्रस्त मराठवाडय़ातील आठ जिल्ह्य़ांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना एसटीचा
मोफत पास देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला
आहे.
- स्वाती पिटलेला श्रद्धांजली म्हणून या योजनेला ‘स्वाती अभय
योजना’ असे नाव देण्यात आले असून १
नोव्हेंबरपासून ही योजना सुरू होणार आहे.
- सध्या केवळ मराठवाडय़ापुरता हा निर्णय मर्यादित असला तरी राज्य
सरकार याबाबत धोरणात्मक निर्णय घेऊन ही योजना उरलेल्या राज्यात लागू करण्याचा
प्रयत्न करेल असे परिवहनमंत्री
दिवाकर रावते यांनी जाहीर केले.
No comments:
Post a Comment