राजीव गांधी जीवनदायी योजनेचे नाव बदलून ते बाळासाहेब ठाकरे जीवनदायी
योजना असा करण्याचा सरकारचा विचार आहे. त्यानिमित्ताने या योजनेबद्दल माहिती करून
घेऊयात.
राजीव गांधी जीवनदायी योजना:
ध्येये: दारिद्र्य रेशेखालील आणि दारिद्र रेशेवरील (पांढरी शिधा पत्रिका
धारक वगळता) अधिकाधिक नागरिकांना सर्वोत्तम व अत्याधुनिक वैद्यकीय सेवेचा
लाभ घेता यावा या करिता राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सोसायटी (महाराष्ट्र सरकार उपक्रम) व नेशनल इंसुरंस का. लिमिटेड यांच्या तर्फे हि योजनाराबवली जात आहे.
फायदे: या
योजनेअंतर्गत ९७२ शस्त्रक्रिया / औषधोपचार व १२१ फेरतापासणी उपचारांचा लाभ घेता
येईल.
उपभोक्ता कुटुंब: १)
पिवळी शिधा पत्रिका धारक कुटुंब २) अंत्योदय अन्ना योजना कार्ड धारक ३) अन्नपूर्णा
कार्ड धारक.
शासनातर्फे उपभोक्ता कुटुंबाला राजीव गांधी आरोग्य ओळख पत्र देण्यात येईल.
शासनातर्फे उपभोक्ता कुटुंबाला राजीव गांधी आरोग्य ओळख पत्र देण्यात येईल.
योजनेचा कालावधी आणि कुटंब साठी ग्राह्य केलेली रक्कम :
- योजने अंतर्गत रुग्णालयामध्ये भारती झाल्यानंतर १,५०,००० रु. पर्यंतचा खर्च प्रत्येक वर्षामध्ये
पूर्ण कुटुंबासाठी देण्यात येईल. याकरिता अधिकृत रुग्णालयामध्ये पैसे न भरता वैद्यकीय सेवा घेता येईल, ह्यासाठी आरोग्य कार्ड किंवा पिवळी व नारिंगी शिधा पत्रिका दाखवणे
गरजेचे आहे.
- ह्या सेवे अंतर्गत कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला पारिवारिक योजने अंतर्गत लाभ गेटा येईल. प्रत्येक कुटुंबासाठी १,५०,००० रु. एकासाठी किंवा सगळ्यात मिळून वापरता येईल. तसेच मूत्रपिंड प्रत्यारोपण साठी २,५०,००० रु. पर्यंत लाभ घेण्यात येईल.
- विमा योजना लागू झाल्या पासून १ वर्षा पर्यंत सर्व उपभोक्त्यांना लाभ घेता येईल.
No comments:
Post a Comment