Thursday, 22 October 2015

जागतिक स्टार्ट-अप क्रमवारीत भारताचा तिसरा क्रमांक

भारतात ४२०० पेक्षा अधिक  नव्या युगातील कंपन्याची (new-age companies) स्थापना होऊन जागतिक स्टार्ट-अप पर्यावरणात (Start-Up Ecosystem) तिसरा क्रमांक मिळवला आहे. पुढील वर्षी भारत या क्रमवारीत दुसरा क्रमांक पटकावण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  नॅसकॉम या आयटी क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेने जाहीर केलेल्या अहवालात हि माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.
अहवालानुसार जगातील मोठ्या प्रमाणात Start-Up Ecosystem असलेले प्रमुख देश
१) अमेरिका २) युनायटेड किंग्डम ३) इंडिया ४) इस्राईल
नॅसकॉम
  • नॅसकॉम ही भारतीय माहिती तंत्रज्ञान (आयटी ) आणि बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग ( बीपीओ ) उद्योगयांची व्यापार संघटना आहे. १९८८ मध्ये स्थापन  झालेली नॅसकॉम ही एक विना-नफा तत्त्वावर चालणारी संघटना आहे.
  • भारतातील आयटी क्षेत्र आणि त्याच्याशी निगडीत उत्पादने व सेवा क्षेत्रांना मदत करने. तसेच या क्षेत्राला जगातील एक विश्वसनीय,आदरयुक्त ,नाविन्यपूर्ण आणि समाज अनुकूल उद्योग बनवून सेवा उद्योग सक्षम करण्यासाठी सर्वस्तरीय मदत करने.

No comments:

Post a Comment

Team MPSC Insights