केंद्रीय अर्थ मंत्रालयाने कर
अधिकार्यांसमोर करदात्याला शारीरिक हजेरी लावण्याची गरज पडू नाही म्हणून
करदात्याच्या सुखात सोय करण्यासाठी इन्कम टॅक्स विभागातर्फे ई- सहयोग पायलट प्रकल्प सुरू केला आहे.
दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली
यांनी या उपक्रमाची सुरुवात केली.
ई-सहयोग प्रकल्पाचे महत्त्वाचे
मुद्दे
- विशेषत: लहान रक्कम भरणाऱ्या करदात्याच्या पालन खर्चात कपात करणे आणि आयकर परतावा भरताना येणाऱ्या फरकाचे निराकरण करण्यासाठी ऑनलाइन यंत्रणा प्रदान करणे.
- डिजिटल उपक्रमाचा भाग म्हणून, आयटी विभाग विविध आयकर परतावा (Income tax return) भरताना येणाऱ्या फरकाची (mismatch) माहिती करदात्यांना एसएमएस, ई-मेल वापरून तसेच ई- सेवा वापरून प्रदान करेल.
- इथून पुढे, ही सेवा वापरून करदात्याला फक्त ई- पोर्टल दाखल भेट द्यावी लागेल आणि वापरकर्ता-आयडी (Username) आणि पासवर्ड वापरून लॉग इन करणे आवश्यक आहे.
त्याचप्रमाणे,
केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दुर्गम भागात विशेष पॅन शिबिरे
घेऊन/उपलब्ध करून लोकांना दारात सार्वजनिक
सेवा प्रदान करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे.
.
No comments:
Post a Comment