Sunday, 25 October 2015

भारत-आफ्रिका शिखर परिषद

भारत-आफ्रिका शिखर परिषद काय आहे?
  • भारताचे पंतप्रधान हे २००८ सालापासून आफ्रिकन देशातील नेत्यांबरोबर एक उच्च स्तरीय बैठकीचे आयोजन करत आहेत. 
  • भारत आणि आफ्रिकेत आलटून पालटून दर तीन वर्षांनी परिषदेचे आयोजन करण्याचे निर्णय घेण्यात आला. 
  • नवी दिल्लीत २००८ साली पहिल्या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते तर २०११ साली आडिस अबाबा येथे दुसरया परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. 
  • २०१४ मधील एबोलाच्या उद्रेकामुळे परिषद पुढे ढकलण्यात आली होती. आणि आता ती २६ ते ३०ऑक्टोबर दरम्यान दिल्लीत आयोजित केली जाते आहे.


कोणते देश यात सहभागी होणार ?
भारताने आफ्रिका खंडातील सर्व ५४ देशांच्या प्रमुखांना निमंत्रित केले आहे. २००८ मध्ये पहिल्या भारत-आफ्रिका शिखर परिषदेला १४ आफ्रिकन देशांना आमंत्रित केले होते तर २०११ मधील दुसऱ्या शिखर परिषदेत १५ आफ्रिकन देशांनी हजेरी लावली. 

भारत अशा परिषदेचे आयोजन का करतोय?

भारताचे आफ्रिकन देशांशी राजकीय, आर्थिक तसेच मोक्याचे (strategic) हितसंबंध आहेत. आफ्रिकन देश विविध संसाधनांनी श्रीमंत आहेत. आफ्रिका खंडातील बरेचसे देश आर्थिक प्रगती पथावर आहेत. जागतिक दहशतवाद आणि हिंदी महासागरातला चेचेगीरीचा प्रश्न असेल भारत आणि आफ्रिकन देश एकाच पानावर आहेत. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या कायम सदस्य होण्याची भारतीय महत्वाकांक्षा असून ५४ देशांची इतकी मोठी परिषद त्यासाठी पाठींबा मिळवण्यासाठीएक मोठे व्यासपीठ आहे.

No comments:

Post a Comment

Team MPSC Insights