नेपाळच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी झालेल्या
निवडणुकीत सत्ताधारी कम्युनिस्ट
पक्षाच्या (मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट) (सीपीएन-यूएमएल) उमेदवार
विद्यादेवी भंडारी यांची निवड करण्यात आली.
- देशाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष होण्याचा बहुमान त्यांनी पटकावला.
- जुनी राजेशाही रद्द केल्यानंतर प्रजासत्ताक बनलेल्या नेपाळने नव्याने स्वीकारलेल्या घटनेनुसार त्यांची राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
विद्यादेवी भंडारीबद्दल:
- जन्म : जून १९६१ नेपाळ मधील भोजपूर येथे.
- सध्या त्या पंतप्रधान खाडगा प्रसाद ओली यांच्या नेतृत्वाखालील सीपीएन-यूएमएलचे पक्षाच्या उपनेत्या आहेत.
- पूर्वी त्यांनी देशाच्या संरक्षण मंत्री म्हणून काम केले आहे आणि महिला हक्कांसाठी काम करणाऱ्या सक्रिय प्रचारक म्हणून त्यांची सर्वाना ओळख आहे.
राम बरन यादव हे नेपाळचे पहिले
प्रजासत्ताक अध्यक्ष म्हणून २००८ साली निवडून आले होते.
भारताप्रमाणेच नेपाळच्या नव्या
राज्यघटने अंतर्गत अध्यक्षपद हे शिष्टाचारिक असून शासनाचा खरा कारभार पंतप्रधान
आणि त्याच्या मंत्रिमंडळकडून हाकला जात असतो.
No comments:
Post a Comment