Tuesday, 20 October 2015

भारत पुढील ३ वर्षे परदेशी गुंतवणुकीसाठी सर्वात आकर्षक ठिकाण.

जागतिक स्तरावरील सल्लागार संस्था 'ईवाय'ने  केलेल्या 'रेडीसेट ग्रो' (Ready,Set,Grow) या  अहवालात काढलेल्या निष्कर्षानुसार परदेशी गुंतवणुकीसाठी भारत जगातील सर्वात आकर्षक देश ठरला आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील पाचशेहून अधिक अधिकाऱ्यांची मते यामध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. ग्राहक
उत्पादने, जीवशास्त्र, मूलभूत सुविधा, तंत्रज्ञान, ऑटोमोटिव्ह, उद्योग अशा विविध स्तरांवरील अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. 


  • अहवालानुसार परदेशी गुंतवणुकीसाठी पसंती मिळवणारे प्रमुख देश:

       १) भारत २) चीन ३) आग्नेय आशिया ४) ब्राझील

  • थेट परकीय गुंतवणूक मिळवणारी  भारतातील प्रमुख शहरे 

      १) बेंगळूर २) मुंबई ३) दिल्ली-NCR ४) पुणे 

  • थेट परकीय गुंतवणूकित मिळवण्यात भारतातील उदयोन्मुख अव्वल पाच शहरे 

      १) अहमदाबाद  २) जयपूर ३) बडोदा  ४) कोईमतूर  ५) विशाखापट्टणम



No comments:

Post a Comment

Team MPSC Insights