Sunday, 25 October 2015

कौशल्य विकास कार्यक्रम

कौशल्य विकास कार्यक्रम
कौशल्य विकास कार्यक्रम युवा वर्गासाठी आधारभूत उपक्रम
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली या कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून देशांतर्गत २०२२ पर्यंत ५० कोटी कुशल मनुष्यबळ या योजनेअंतर्गत तयार करण्याचा हा महत्वाकांक्षी उपक्रम आहे.
  • महाराष्ट्रातून ४.५० कोटी कुशल मनुष्यबळाचे उद्दिष्ट आहे.
खालील संस्थांचा कौशल्य विकास मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या कौशल्य विकास कार्यक्रमात समावेश होतो.

Ø राष्ट्रीय कौशल्य विकास एजन्सी (National Skill Development Agency:एन.एस.डी.ए)
Ø राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (National Skill Development Corporation: एन.एस.डी.सी)
Ø  राष्ट्रीय कौशल्य विकास निधी (National Skill Development fund:एन.एस.डी.एफ.)
Ø  ३३ सेक्टर कौशल्य परिषदा (Sector Skill Councils:एस.एस.सी)

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास कार्यक्रम

  • मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय शिखर परिषद
  • मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्य कौशल्य विकास कार्यकारिणी समिती.
  • राज्यात सर्वत्र या कौशल्य विकास योजनेचे सनियंत्रण आणि नियोजन तसेच प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्था स्थापन करण्यात आली नोडल एजन्सी म्हणून ही संस्था राज्यात काम करीत आहे.

No comments:

Post a Comment

Team MPSC Insights