Tuesday, 20 October 2015

जमैकाचे लेखक मारलॉन जेम्स यांना यंदाचा मॅन बुकर पुरस्कार जाहीर


अ ब्रीफ हिस्टरी ऑफ सेव्हन किलीग्न्स (A BRIEF HISTORY OF SEVEN KILLINGS) या ऐतिहासिक कादंबरीसाठी जमैकाचे  लेखक मारलॉन जेम्स यांना यंदाचा मॅन बुकर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुरस्काराच्या इतिहासात प्रथमच जमेकाच्या लेखकाला हा पुरस्कार मिळाला आहे.
बॉब माल्रे यांच्या १९७६ मध्ये झालेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या घटनेवर हे पुस्तक आधारित आहे.
मॅन बुकर पुरस्कार:
·         मॅन बुकर पुरस्कार  १९६९ पासून  Man Group संस्थेकडून देण्यात येतो.
·         कुठल्याही देशाच्या इंग्रजीतून लेखन करणाऱ्या साहित्यिकांसाठी खुला आहे, पण त्यासाठी ते पुस्तक ब्रिटनमध्ये प्रकाशित झालेले असणे आवश्यक असते. पूर्वी या पुरस्कारात ब्रिटन व राष्ट्रकुल देश, आर्यलड व झिम्बाब्वे यांनाच सहभागी होता येत असे.

·         पुरस्काराची रक्कम ५० हजार पौंड इतकी आहे.

No comments:

Post a Comment

Team MPSC Insights