शांततेचे नोबेल पारितोषिक विजेते कार्यकर्ते
कैलाश सत्यार्थी यांना हार्वर्ड विद्यापीठाचा प्रतिष्ठेचा मानवतावाद पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सत्यार्थी हे हा पुरस्कार मिळालेले पहिलेच भारतीय आहेत. मानवतावादी पुरस्कार हा सत्यार्थी यांना त्यांच्या बालगुलामगिरी नष्ट करण्याच्या कामासाठी दिला गेला आहे. सत्यार्थी हे मानवी तस्करी, बालकांची गुलामगिरी टाळण्यासाठी व बालकामगार प्रथा नष्ट करण्यासाठी बचपन बचाव आंदोलन (save the child movement) या स्वयंसेवी संस्थेमार्फत काम करत आहेत. या
संस्थेने आजवर वेठबिगार, तस्करी आणि गुलामगिरी यात
अडकलेल्या ८०००० पेक्षा अधिक मुलांना बाहेर काढले आहे.
हार्वर्ड फाउंडेशनचा मानवतावाद
पुरस्कार:
लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी काम करणाऱ्यांना हा पुरस्कार १८८४ सालापासून दिला जातो. पहिल्याच वर्षी
म्हणजे १९८४ साली तो
मार्टिन ल्यूथर किंग सीनियर या
नागरी हक्कांसाठी लढणाऱ्या नेत्याला देण्यात आला.
संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव बान की मून यांना २०१४ चा मानवतावाद पुरस्कार आणि मलाला युसुफजाई यांना
२०१३ साली हा पुरस्कार देण्यात आला आहे.

No comments:
Post a Comment