- दिल्लीतील घरकाम करणाऱ्या महिलांचा मंच विरुद्ध युनियन ऑफ इंडिया या निकालात सर्वोच्च न्यायालयाने बलात्कारास बळी पडलेल्या दुदैवी महिलेचे अश्रू पुसण्यासाठी एक योजना विकसित करावी, असे निर्देश दिले होते.
- लक्ष्मी विरुद्ध युनियन ऑफ इंडिया या केसच्या निकालात ACID हल्ल्यात बळी पडलेल्या व्यक्तींना अर्थिक सहाय्य करण्याबाबतची योजना तयार करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले होते.
- Protection of Children from Sexual Offences Act २०१२ (POCSO) या कायद्याअंतर्गत १८ वर्षाखालील बालकांच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी त्यांचे पुनर्वसन करणे आवश्यक आहे.
मनोधैर्य योजना:
- योजनेअंतर्गत बलात्कार व बालकावरील लैंगिक अत्याचार प्रकरणी किमान रु.२,००,०००/- (रुपयेदोन लाख फक्त) व विशेष प्रकरणामध्ये कमाल रु. ३,००,०००/-(रुपयेतीन लाख फक्त) अर्थिक सहाय्य अनुज्ञेय राहील.
- Acid हल्ल्यात जखमी झालेल्या महिला व बालकास त्यांचा चेहरा विद्रूप झाल्यास अथवा कायमचे अपंगत्व आल्यास ३,००,०००/- (रुपयेतीन लाख फक्त)
- Acid हल्ल्यात इतर जखमा झालेल्या महिला व बालकांना रु ५००००/- इतके अर्थिक सहाय्य अनुज्ञेय राहील.

No comments:
Post a Comment