- धर्माधाय संस्था तसेच नफा मिळविण्याचा उद्देश नसणाऱ्या कंपन्यांना परदेशातून मिळणाऱ्या पैशावर देखरेख ठेवण्यासाठी केंद्र सरकारने १९७६ साली परकीय निधी नियंत्रण कायदा (फॉरिन कॉन्ट्रिब्यूशन रेग्युलेशन ACT: FCRA) मंजूर केला होता.
- या कायद्याचे नियमन आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवणाऱ्या रिझर्व बँकेकडे नसून ते केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारित येते.
- या कायद्यानुसार परदेशी नागरीकीत्व असणाऱ्या व्यक्तीकडून,कंपनीकडून मदतरूपी भेट/देणगी देण्यापूर्वी या कायद्यांतर्गत गृह मंत्रालयात नोंद करणे आवशयक आहे.
- गृह मंत्रालयाची पूर्वपरवानगी न घेता अशी भेट अथवा देणगी स्वीकारल्यास तो या कायद्यांतर्गत दखलपात्र गुन्हा ठरतो.
- केंद सरकारने २०१० साली अमुलाग्र बदल केले आहेत. त्यानुसार ५ वर्षानंतर परवानगीचे नुतनीकरण करणे आवश्यक आहे.
- नरेंद्र मोदी सरकारने ग्रीनपीस या संस्थेविरुद्ध कारवाई याच कायद्यांतर्गत केली होती.
Monday, 26 October 2015
परकीय निधी नियंत्रण कायदा
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment