- रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी 30 हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे उद्दिष्ट निश्चि्त करण्यात आले असून त्यासाठी अपेक्षित खर्च 13 हजार 500 कोटीं इतका आहे.
- राज्यातील 730 किलोमीटरच्या नवीन रस्त्यांची जोडणी करण्यात येणार असून, त्यासाठी 328 कोटी खर्च येणार आहे.
- ग्रामविकास विभागाच्या महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेमार्फत ही योजना राबविण्यात येणार आहे.
प्रधानमंत्री
ग्रामसडक योजना
- प्रधानमंत्री ग्रामसडक योजना ( PMGSY) 25 डिसेंबर 2000 सुरू करण्यात आली ही एक पूर्णपणे केंद्र पुरस्कृत व अनुदानीत योजना आहे.
- देशातील ग्रामीण भागात सर्व हंगामात रस्ते उपलब्ध होण्यासाठी हा उपक्रम सुरु करण्यात आला. ५०० व्यक्ती लोकसंख्या असलेल्या सर्व सपाट प्रदेशाच्या ठिकाणी आणि २५० व्यक्ती असलेल्या टेकडी,आदिवासी किंवा वाळवंटी भागात रस्त्यांची जोडणी करणे हा उद्देश होय.

No comments:
Post a Comment