मटण, बीफ तसेच पोर्कसारख्या लाल मांसामुळे कॅन्सरचा धोका वाढतो, असा निष्कर्ष जागतिक आरोग्य संघटनेने २० वर्षांच्या अभ्यासाअंती काढला
आहे.
- इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर या जागतिक आरोग्य संघटनेच्या अखत्यारितील संस्थेने १० देशांतील २२ संशोधकांच्या संशोधनाचा निष्कर्ष जाहीर केला आहे.
- अमेरिकन, युरोपीयन, आफ्रिकन तसेच काही आशियाई देशांमधील रोजच्या आहारात आढळणारे बेकन, सॉसेजेस आणि हॅम या प्रक्रिया केलेल्या मांसाहारी पदार्थांचेही या धोकादायक यादीत वरचे स्थान आहे
- लाल मांसामुळे कोनोरेक्टल, पॅनक्रियाटिक व प्रोस्टेट कॅन्सरचा धोका बळावतो. त्यातही दररोज ५० ग्रॅम लाल मांस खाणा-यांमध्ये कॅन्सरचा धोका १८ टक्क्यांनी वाढतो, असा निष्कर्ष या अभ्यासात मांडण्यात आला आहे.
जागतिक आरोग्य संघटना-(WHO):
- WHO घटना ७ एप्रिल १९४८ रोजी अंमलात आली. म्हणून दरवर्षी जागतिक आरोग्य दिन ७ एप्रिल या दिवसी साजरा केला जातो.
- डब्ल्यूएचओच्या घटनेनुसार आरोग्य म्हणजे फक्त रोग किंवा पांगळेपणापासून मुक्ती मिळणे हे नव्हे तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिक जीवनात परिपूर्ण कल्याण होणे होय.
- WHO definition of Health- Health is a state of complete physical, mental and social well-being and not merely the absence of disease or infirmity.

No comments:
Post a Comment