भारतात 'बुलेट ट्रेन' साठी जपानचे अर्थसहाय्य करण्याची तयारी
- देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई ते अहमदाबाद या ५०५ किमी अंतरासाठी ही बुलेट ट्रेन विकसित करण्याची योजना असून, त्यासाठी सुमारे १५ अब्ज डॉलर्स इतका खर्च अपेक्षित आहे.
- "बुलेट ट्रेन‘ विकसित करण्यासाठी जपानने १ टक्क्यापेक्षा कमी व्याजदर असलेले अर्थसहाय्य करण्याचा प्रस्ताव जपानने मांडला आहे.
- “डायमंड क्वाड्रिलॅटरल” (Diamond Quadrilateral) या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत दिल्ली, मुंबई, अहमदाबाद आणि चेन्नई या देशातील प्रमुख शहरांना जोडणारे, सुमारे १० हजार किमी अंतराचे खास "बुलेट ट्रेन नेटवर्क‘" विकसित करण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवण्यात आले आहे.
- दिल्ली ते मुंबई या १२०० किमी अंतरामध्ये जलदगती ट्रेन विकसित करण्यासंदर्भातील प्रस्तावाची पडताळणी करण्यासंदर्भातील कंत्राट मिळविण्यात चीनला यश आले होते.

No comments:
Post a Comment