Sunday, 25 October 2015

'स्वच्छ महाराष्ट्र, स्वच्छ विद्यालय

नवीन राष्ट्रीय मोहीम, स्वच्छ भारत, स्वच्छ विद्यालय (SBSV), किंवा स्वच्छ भारत: स्वच्छ शाळा, भारतीय सरकारकडून सप्टेंबर २०१४ मध्ये सुरू करण्यात आली. 
याअंतर्गत खालील ६ अत्यावश्यक घटक आहेत
१) स्वच्छता २) दुपारचे जेवण करण्यापूर्वी साबणाने दररोज हात धुणे ३) पिण्याचे पाणी ४) वर्तणुक बदल उपक्रम ५) क्षमता वृद्धिगत करणे ६) ऑपरेशन आणि देखभाल- पाणी,स्वच्छता आणि हात धुण्यासाठी असलेल्या सुविधांची ऑपरेशनल आणि देखभाल करणे.
  • स्वच्छ भारत अभियानाचा भाग म्हणून राज्यातील शाळांमध्ये 'स्वच्छ महाराष्ट्र, स्वच्छ विद्यालय' हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यामध्ये शाळांमध्ये 'हॅण्डवॉश स्टेशन्स' सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला पाच लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
हॅण्डवॉश स्टेशन' म्हणजे काय?
युनिसेफ या संस्थेने कमीत कमी जागेत जास्तीत जास्त विद्यार्थी चांगल्या पद्धतीने हात धुऊ शकतील, अशी एक संकल्पना मांडली असून, त्याला 'हॅण्डवॉश स्टेशन' असे म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

Team MPSC Insights