Monday, 30 November 2015

स्व. गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी स्व. गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात विमा योजना २०१५-१६ या वर्षापासून राबविण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.
  • विमा कंपन्यांना विमा हप्त्याची रक्कम दिल्यापासून १२ महिने कालावधीसाठी शेतकऱ्यांना दोन लाख रूपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे.
  • योजनेचा लाभ सात-बारावरील नोंदीप्रमाणे १० ते ७५ वर्षे वयोगटातील राज्यातील एक कोटी ३७ लाख शेतकऱ्यांना होणार आहे.
  • राज्यात सध्या राबविण्यात येत असलेल्या शेतकरी जनता अपघात विमा योजनेची मुदत ३० नोव्हेंबर २०१५ रोजी समाप्त होत असल्याने ही नवी योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
  • विमाधारक शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू, अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी तसेच अपघातामुळे एक डोळा व एक अवयव निकामी अशा तिन्ही प्रकारच्या जीवित हानीसाठी दोन लाख रूपये तर अपघातामुळे एक डोळा अथवा एक अवयव निकामी झाल्यास एक लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळणार आहे.
  • योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी किंवा त्यांच्या वतीने अन्य कोणत्याही संस्थेने विमा कंपन्याकडे स्वतंत्ररित्या विमा हप्त्याची रक्कम भरण्याची गरज नाही. सर्व खातेदार शेतकऱ्यांचा हप्ता राज्य शासनाद्वारे भरण्यात येणार आहे.
  • मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांची पत्नी, शेतकरी स्त्रीचा पती, अविवाहित मुलगी, आई, मुले, नातवंडे, विवाहित मुलगी या योजनेचे लाभ घेण्यासाठी वारसदार ठरणार आहेत.
  • शेती करताना होणारे अपघात, रेल्वे, रस्त्यावरील अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतुनाशके हाताळताना किंवा अन्य कारणांमुळे विषबाधा, विजेचा धक्का बसणे, वीज पडणे, खून, उंचावरुन पडून अपघात, सर्पदंश, विंचूदंश, नक्षलवाद्यांकडून झालेली हत्या, जनावरांच्या खाण्यामुळे/चावण्यामुळे जखमी किंवा मृत्यू, दंगल, अन्य कारणांमुळे शेतकऱ्यांचा मृत्यू होतो किंवा अपंगत्व आल्यास त्याच्या कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते. या शेतकऱ्यांना आर्थिक लाभ देण्यासाठी ही योजना राबविण्यात येईल.

Source: Gov. of Maharashtra

पेंटाव्हॅलंट लसीकरण- पाच रोगांपासून मुक्तता

दरवर्षी जगात पाच वर्षांखालील ३ लाख ७० हजारहून अधिक बालके हिबमुळे (हिमोफीलस इन्फ्लूएन्झा टाईप बी) दगावतात. त्यापैकी भारतामध्ये मृत्यूमुखी पडणाऱ्या बालकांचे प्रमाण २० टक्के आहे.
  • हिब रोगातून वाचलेली बालके कायमस्वरुपी अपंग अथवा कर्णबधीर होतात अथवा त्यांच्या मेंदूला इजा पोहोचते. हा धोका लक्षात घेवून केंद्र सरकारने महाराष्ट्रासह काही निवडक राज्यांमध्ये राष्ट्रीय लसीकरण उपक्रमांतर्गत पेंटाव्हॅलंट लसीकरण कार्यक्रम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • पेंटाव्हॅलंट लसीमुळे बालकांचे घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, हेपिटायटिस बी आणि हिब (हिमोफीलस इन्फ्लूएन्झा टाईप बी) या पाच प्राणघातक रोगांपासून संरक्षण होते.
  • भारतामध्ये डीपीटी (घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात आणि हेपिटायटिस बी) यांचा समावेश नियमित लसीकरण कार्यक्रमात या आधीच करण्यात आला आहे. यामध्ये हिब लस नव्याने समाविष्ट करण्यात आली आहे. एकत्रितपणे या समुच्चयाला ‘पेंटाव्हॅलंट’ असे संबोधण्यात येते.
  • बालवयात होणाऱ्या रोगांना प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण ही सर्वज्ञात आणि सर्वात प्रभावी पद्धतीपैकी एक आहे.. 

हिब म्हणजे काय ? त्याच्यामुळे कोणते रोग उद्भवतात ?

हिब हे हिमोफिलिस इन्फ्लुएंझा टाईप बी याचे संक्षिप्त रुप आहे. या प्रकारच्या जिवाणूमुळे गंभीर प्रकारचे संसर्ग होतात.
1) बॅक्टेरियल मेनिंजायटिस- मज्जारज्जू आणि मेंदू यांना झाकणाऱ्या पटलांना असलेली दाहक सूज हा अतिशय गंभीर प्रकारचा संसर्ग आहे.
2) न्यूमोनिया- फुप्फुसांना आलेली दाहक सूज.
3) सेप्टिसेमिया- रक्तामध्ये उपस्थित असलेले संसर्गजन्य जिवाणू.
4)सेप्टिक आर्थ्रायटिस- सांध्यांना आलेली दाहक सूज.
5) एपिग्लोटायटिस - स्वरयंत्राच्या आसपासच्या जागेला आलेली दाहक सूज आणि श्वसन नलिकेत आलेला अडथळा.

हिब म्हणजे हेपिटायटिस बी (हेप बी) नव्हे, हेपिटायटिस ‘बी’ हा आजार विषांणूमूळे होतो आणि यकृताच्या कार्यावर परिणाम करतो.
हिबचा संसर्ग कसा होवू शकतो, पसरु शकतो ?

हिबचा जिवाणू संसर्ग झालेल्या बालकाच्या खोकल्यातून अथवा शिंकेतून उडालेल्या लाळेच्या थेंबाद्वारे एका बालकाकडून दुसऱ्या बालकाकडे संक्रमित होतो. तसेच बालके जेव्हा तोंडात घातलेली खेळणी आणि अन्य वस्तू एकमेकांना देतात तेव्हा देखील हिबचा प्रसार होतो.


MPSC Insights QUIZ 6

1.    अलीकडेच  युनायटेड नेशन्सने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार प्रत्येक वर्षी कुठल्या प्रदूषणामुळे लाखो लोकांचा अकाली मृत्यू होतो असा उल्लेख केलेला आहे?
A. जलप्रदूषण
B. भू-प्रदूषण
C. हवा-प्रदूषण
D. थर्मल प्रदूषण
2.    प्रथम दिवस-रात्र कसोटी सामना अॅडलेड येथे २७ नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू झाला. यात वापरल्या जाणाऱ्या चेंडूचा रंग कोणाता आहे?  
A.  गुलाबी
B.  जांभळा
C.  पिवळा
D.  लाल
3.    २७ नोव्हेंबर २०१५ रोजी पहिल्यांदाच इस्रायली नौदलाच्या प्लॅटफॉर्मवरून यशस्वीरित्या उड्डाण चाचणी करण्यात आलेल्या लांब पल्ल्याचे जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रचे नाव?
A. धनुष क्षेपणास्त्र
B. बराक -८
C. पृथ्वी २
D. अग्नी १
4.    कोणत्या संस्थेने २०१५ सर्वाधिक तापमान असलेले वर्ष म्हणून नुकतेच घोषित केले आहे?
A. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम
B. जागतिक आरोग्य संघटना
C जागतिक पर्यटन संघटना
D.जागतिक हवामान संघटना
5.    भारत सरकारने ८ वर्ष कालावधी असलेले गोल्ड बाँड जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत किमान किती ग्रॅम किमतीचे बाँड घेणे अनिवार्य आहे?
A. १ ग्रॅम
B. ४ ग्रॅम
C. २ ग्रॅम
D. ५ ग्रॅम
6.    भारतातील कुठल्या राज्यात एप्रिल २०१६ पासून दारू विक्रीवर बंदी घालण्यात येणार आहे?
A. तामिळनाडू
B. केरळ
C. बिहार
D. हरियाणा
7.    खालीलपैकी कुठल्या बँकेने कमी उत्पन्न असणाऱ्या राज्यांना मदत करण्यासाठी नीव नावाचा निधी सुरू केला आहे?
A. आयसीआयसीआय बँक
B. अॅक्सिस बँक
C. एसबीआय
D. यापैकी नाही
8.    महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अंतर्गत प्रत्येक शेतक-याला किती किमतीचे  वार्षिक विमा संरक्षण मिळणार आहे?
A.Rs १ लाख
B.Rs १.५ लाख
C.Rs ३ लाख
D.Rs २ लाख
9.    टार्गेट ऑलिम्पिक पोडीअम योजनेच्या  (TOPS) अध्यक्षपदी खालील कोणत्या खेळाडूला नियुक्त केले आहे?
A. इंदरजित  सिंग
B. अंजू बॉबी जॉर्ज
C.अभिनव बिंद्रा
D. अनुराग ठाकूर
10. भारत सरकारने कुणासाठी सुगम्य भारत अभियान सुरु केले आहे?
A. वृद्ध व्यक्तिंसाठी
B. अपंग व्यक्तिंसाठी
C. अंध व्यक्तींसाठी
D. विधवा महिलांसाठी


Write your answers in comment section.... 
Answers will be provided in coming days



Sunday, 29 November 2015

युनेस्को फेलिनी पदक पुरस्कार भारतात प्रथमच इफ्फीत देण्यात येणार


युनेस्को फेलिनी पदक ४६ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) येथे चित्रपट, दूरदर्शन आणि ऑडिओ व्हिज्युअल कम्युनिकेशन यासाठीची आंतरराष्ट्रीय परिषद (ICFT), पॅरिस या संस्थेच्या सहकार्याने भारतात प्रथमच पुरस्कार देण्यात येणार आहे.
  • युनेस्को फेलिनी पदक युनेस्कोचे आदर्श प्रतिबिंबित करणाऱ्या चित्रपटाला दिले जाते.
  • फेलिनी पदकाचे पहिल्यांदा १९९५ मध्ये कान चित्रपट महोत्सवात अनावरण करण्यात आले.
  • पदकाचे दुहेरी महत्व आहे -
  • इटालियन दिग्दर्शक फेदेरिको फेलिनी यांचे चित्रपट आणि कला क्षेत्रातील योगदान आणि चित्रपट जन्माचे शंभरी साजरी करण्यासाठी १९९५ पासून (१८९५-१९९५) हा पुरस्कार देण्यात येतो.

युनेस्को
युनेस्कोचे घोषवाक्य-   "पुरुष आणि महिलांच्या मनात शांतता निर्माण करणे"  (Building peace in the minds of men and women)
युनेस्को युनायटेड नेशन्सची  "बौद्धिक" एजन्सी म्हणून ओळखले जाते.


Saturday, 28 November 2015

बराक ८ क्षेपणास्त्राचे यशस्वी उड्डाण

इस्राएल एरोस्पेस इंडस्ट्रीज आणि डीआरडीओ यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित लांब पल्ल्याचे जमिनीवरून हवेत मारा करणारे बराक ८ हवाई क्षेपणास्त्राने (Long Range Surface to Air Missile-LRSAM) यशस्वीरित्या इस्रायली नौदलाच्या चाचणी प्लॅटफॉर्मवरून उड्डाण केले.
बराक ८ क्षेपणास्त्र बद्दल-
  • LRSAM ला इस्राएलमध्ये  बराक ८ क्षेपणास्त्र देखील म्हटले जाते. हिब्रू भाषेत याचा अर्थ विजा असा होतो.
  • बराक- ८ हे बराक क्षेपणास्त्राचे विकसित रूप असून ते हेलिकॉप्टर, विमान, ड्रोन किंवा  क्षेपणास्त्र हल्ल्यात नौसेनेचे संरक्षण करण्यासाठी विकसित करण्यात आले आहे.
  • क्षेपणास्त्रची दोन्ही समुद्रातून मारा करणारी आणि जमीन आधारित आवृत्ती अस्तित्वात आहे.



Friday, 27 November 2015

अंजू बॉबी जॉर्ज यांची TOPS च्या अध्यक्षपदी नियुक्ती

माजी लांब उडी चॅम्पियन अंजू बॉबी जॉर्ज यांची  लक्ष्य ऑलिम्पिक व्यासपीठ योजनेची  (Target Olympic Podium Scheme-TOPS) अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 
लक्ष्य ऑलिम्पिक व्यासपीठ योजनेबद्दल
  • लक्ष्य ऑलिम्पिक व्यासपीठ योजना (TOPS ) राष्ट्रीय क्रीडा विकास निधी (National Sports Development Fund-NSDF) अंतर्गत २०१६ आणि २०२० सालच्या ऑलिंपिक स्पर्धेत संभाव्य पदक विजेत्या खेळाडूंचा शोध घेणे व त्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी तयार करण्यात आली आहे.
  • या योजनेअंतर्गत ऍथलेटिक्स, तिरंदाजी, बॅडमिंटन, बॉक्सिंग, कुस्ती आणि नेमबाजी ह्या खेळांवर लक्ष्य केंद्रित केले आहे.
राष्ट्रीय क्रीडा विकास निधी (NSDF)
  • राष्ट्रीय क्रीडा विकास निधीची  (NSDF) १९९८  मध्ये युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाद्वारे  स्थापना करण्यात आली.
  • गैर-सरकारी संसाधने ज्यात खाजगी / सार्वजनिक क्षेत्राचाही समावेश असेल आणि अनिवासी भारतीय यांच्याकडून मिळणाऱ्या संसाधनांच्या सहाय्याने देशातील खेळ आणि खेळांचा प्रसार या उद्देशाने स्थापना करण्यात आली.
  • NSDF अंतर्गत उपलब्ध निधी प्रामुख्याने प्रमुख आंतरराष्ट्रीय पदक मिळविण्याची संभावना असलेल्या खेळाडूंना सरकारने पूरक मदत म्हणून वापरला जातो.
  • त्यांच्या विशिष्ट प्रशिक्षणाची  आवश्यकता भागविण्यासाठी देशात आणि परदेशात आणि वैज्ञानिक आधार असलेली प्रशिक्षणाची तरतूद, उपकरणे खरेदी तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग इ. साठी या निधीचा वापर करण्यात येतो. 


MPSC Insights QUIZ 5 ANSWERS

1.   राष्ट्रीय उत्पादन धोरण अंतर्गत सौ निर्मला सीतारामन यांनी तंत्रज्ञान संपादन आणि विकास निधी (TADF) अलीकडेच जाहीर केला आहे. कुठल्या  क्षेत्राला  यामुळे चालना मिळेल?
A. बँक
B. सूक्ष्म लघु आणि मध्यम उपक्रम (MSME)
C. दूरसंचार (Telecom)
D. माहिती व तंत्रज्ञान (IT)
सूक्ष्म लघु आणि मध्यम उपक्रम (MSME)
2.   आंतरराष्ट्रीय दहशतवाद निर्देशांक २०१५ नुसार २०१४  साली दहशतवादाने सर्वात जास्त प्रभावित झालेल्या देशांच्या क्रमवारीत भारताचा कितवा क्रमांक लागतो?
A.१२३
B.९६
C.६
D.८
3.   भारत-रशिया दरम्यान सैन्य यांच्या दरम्यान सैन्य कसरती आणि सरावाचे ७वे पर्व अलीकडेच बिकानेर येथे पार पडले. या सराव कार्यक्रमाचे  नाव काय?
A.हातात हात (Hand-in-Hand)
B.इब्सामार
C.कोंकण
D. इंद्र
इंद्र
4.   वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जाहीर केलेल्या आंतरराष्ट्रीय लिंग निर्देशांक यानुसार भारताचा कितवा क्रमांक आहे? 
A.१०८
B.१२५
C.१३०
D.१०२
१०८
5.   आर्थिक व्यवहार कॅबिनेट समितीने ऊस शेतक-यांना प्रति क्विंटल किती उत्पादन अनुदान देण्याचे जाहीर केले आहे?
A.रु.  ४.७५
B.रु.  ३.५०
C.रु.  ४.५०
D.रु.  ३.७५
रु.  ४.५०

6.   २०१५ सालचा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार खालील कुठल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या कार्यालयाला प्रदान करण्यात येणार आहे?
A. संयुक्त राष्ट्र  हवामान बदल  फ्रेमवर्क कन्व्हेन्शन (UNFCC)
B. संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतीक संघटना (UNESCO)
C.संयुक्त राष्ट्र  शरणार्थी उच्चायुक्त (UNHCR)
D.संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संघटना (UNWTO)
संयुक्त राष्ट्र  शरणार्थी उच्चायुक्त (UNHCR)

7.   फ्रान्सने  दहशतवादी हल्ल्यांच्या  मालिकेनंतर तात्काळ आणीबाणी जाहीर केली आहे. फ्रान्सचे  अध्यक्ष कोण आहेत?
A. डेवीड कॅमेरॉन
B. जस्टीन त्रुदू
C. फ्रान्कीस होल्लांडे
D. टोनी टॅन
फ्रान्कीस होल्लांडे
8.   कुठल्या तारखेला जागतिक मधुमेह दिन साजरा केला जातो ?
A. १२ नोव्हेंबर
B. ११नोव्हेंबर
C. १४नोव्हेंबर
D. १० नोव्हेंबर
१४नोव्हेंबर
9.   भारताचे ४३ वे  मुख्य सरन्यायाधीश म्हणून म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली?
A) न्याय.  तीर्थ सिंग ठाकूर
B)  न्याय.पी सदाशिवम
C) न्याय. व्ही. खरे
D)  न्याय. आदर्श सेन आनंद
न्याय.  तीर्थ सिंग ठाकूर

10.               १९ नोव्हेंबर २०१५  रोजी साजरा करण्यात आलेल्या जागतिक शौचालय दिवसाची घोषणा काय होती ?
अ) स्वच्छता आणि पोषण
ब) एकात्मता आणि प्रतिष्ठा जपण्यासाठी शौचालय
क) सर्वांसाठी स्वच्छता
ड) शौचालय आवश्यक आहे
स्वच्छता आणि पोषण


Team MPSC Insights