राज्यातील शेतकर्यांना सौर कृषी पंप देण्यासाठी 'अटल सौर कृषी पंप योजना' राबविण्यात येणार आहे.
- योजनेंतर्गत राज्यातील पाच लाख शेतकर्यांना सौर कृषी पंप देण्यात येणार आहेत.
- पहिल्या टप्प्यात दहा हजार सौर कृषी पंपाचे वाटप करण्यात येणार असून लवकरच संपूर्ण राज्यात योजनेची अंबलबजावणी केली जाणार आहे.
- अटल सौर कृषी पंप योजना जनतेपर्यंत पोचविण्यासाठी; तसेच सौर पंपांची उपयुक्तता शेतकऱ्यांना पटवून देण्यासाठी जिल्हास्तरावर प्रचार व प्रसार मोहीम राबवली जाणार आहे.
महाराष्ट्र आणि केंद्र
सरकार अपारंपरिक उर्जेच्या वापरला प्राधान्य देताना दिसून येत आहे.
- महाराष्ट्र राज्याने अक्षय ऊर्जा धोरण २०१५ जाहीर केले आहे.
- केंद्र सरकारने नवीन धोरणानूसार २०२२ पर्यंत अक्षय ऊर्जा क्षमता १७५ GW इतके लक्ष केंद्रित केले आहे. आपण दोन्ही धोरणांनुसार लक्ष ठरविण्यात आलेल्या विविध उर्जेंचा एकत्रित विचार करुयात.
ऊर्जा
|
महाराष्ट्र (MW)
|
भारत (GW)
|
सौर
ऊर्जा
|
७५००
|
१००
|
पवन
ऊर्जा
|
५०००
|
६०
|
लघु
जलविद्युत प्रकल्प
|
४००
|
५
|
कृषी/ऊस
आधारित वीज निर्मिती प्रकल्प
|
१३००
|
१०
|
औद्योगिक कचरा वीज निर्मिती
|
२००
|
|
एकूण ऊर्जा
|
१४४००
|
१७५
|
- १ GW
= १००० MW
No comments:
Post a Comment