Friday, 6 November 2015

कॅनडाच्या मंत्रीमंडळात भारतीय वंशाच्या ४ व्यक्तींची वर्णी

कॅनडात नुकत्याच झालेल्या संसदीय निवडणुकीत लिबरल पक्षाने विजय प्राप्त केला. त्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळाच्या वाटपात भारतीय  वंशाच्या ३ शीख नागरिकांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे अगदी काही दिवसांपूर्वी कॅनडात पंजाबी भाषेला विशेष दर्जा दिला गेला आहे.

1) हरजीत सिंग सज्जन
  • कॅनडाच्या सशस्त्र दलातील माजी लेफ्टनंट कर्नल हरजित सज्जन यांना संरक्षणमंत्रीपद देण्यात आले आहे. 
  • सज्जन यांनी बोस्निया, अफगाणिस्तानात उल्लेखनीय कार्य केलेले आहे.
  • कॅनडातील लष्करातील ते पहिले शीख अधिकारी होते.
  • २०१३ मध्ये त्यांना शौर्य सेना मेडल प्रदान करण्यात आले आले आहे.
2) नवदीप बैन्स- संशोधन, विज्ञान आणि आर्थिक विकास खाते
3) अमजरजीत सोही-   पायाभूत विकास खाते
4) बर्दीश झग्गर-लहान व्यवसाय व पर्यटन मंत्री
  • मंत्रिमंडळात ३० पैकी १५ महिलांचा समावेश केला गेला आहे. ५०% महिलांचा व सर्व धर्म पंथाच्या समावेश करून सर्वसमावेशक कारभाराची मुहूर्तमेढ केली आहे.
कॅनडात नुकत्याच पार पडलेल्या संसदीय निवडणुकीत लिबरल पक्षाने जस्टिन त्रुडो यांच्या नेतृत्वाखाली लढवलेल्या निवडणुकीत दिवंगत पंतप्रधान स्टीफन हार्पर यांच्या पुराणमतवादी (conservative) पक्षाचा पराभव केला.
जस्टिन त्रुडो - नवीन पंतप्रधान हे कॅनडाचे दिवंगत माजी पंतप्रधान पिएर त्रुडो यांचे पुत्र आहेत.
भारतीय राज्यघटनेत खालील वैशिष्ट्ये कॅनडाच्या शासन पद्धतीतून घेतली आहेत
  • मजबूत केंद्र असलेली संघशासन व्यवस्था
  • राज्यपालाची केंद्र सरकारकडून केली जाणारी नेमणूक
  • सर्वोच्च न्यायालयाला केंद्र शासनाला सल्ला देण्याची कार्यकक्षा (Advisory jurisdiction)
  • केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात विभागलेले विषय सोडून उरलेले सर्व विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतील. (residuary powers)

No comments:

Post a Comment

Team MPSC Insights