पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जी-२० देशांच्या २०१५ सालच्या
बैठकीसाठी तुर्कस्तानच्या अँतल्या शहरात पोचले आहेत.
- गेल्या वर्षी २०१४ साली ही बैठक ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन या शहरात आयोजित करण्यात आली होती.
जी-२० गटाबद्दल थोडक्यात:
- जी-२० हा सदस्य राष्ट्रांसाठी आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्य आणि जागतिक निर्णय प्रक्रियेसाठी विविध राष्ट्राप्रमुखांचा एक मंच आहे.
- जी-२० ची सुरुवात १९९९ मध्ये आशियाई वित्तीय संकटाचा परिणाम म्हणून वित्त मंत्री आणि सेंट्रल बँक ऑफ गव्हर्नरची बैठक यातून झाली.
- २००८ मध्ये, जी-२० देशांच्या सर्वोच्च नेत्यांची समिट वॉशिंग्टन डी.सी., युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका येथे आयोजित करण्यात आली होती, आणि या गटाने जागतिक वित्तीय संकटाला सामोरे जाताना महत्त्वाची भूमिका बजावली. जी-२० नेते २००८ पासून नऊ वेळा भेटले आहेत.
- जी-२० राष्ट्रांचे नेते दरवर्षी भेटतात त्याचप्रमाणे वित्त मंत्री आणि त्या देशांच्या सेंट्रल बँकेचे गव्हर्नर जागतिक अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी, आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्था सुधारणेसाठी, आर्थिक नियम सुधारण्यासाठी आणि प्रत्येक सदस्य राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत आवश्यक अशा आर्थिक सुधारनेंची अंमलबजावणी करण्यासाठी वर्षात नियमितपणे भेटत असतात.
जी-२० सदस्य राष्ट्र- १९ देश आणि युरोपियन युनियन यांचा या गटात समावेश आहे.
जगातील प्रमुख विकसित देश अमेरिका (युनायटेड
स्टेट्स), ब्रिटन, युरोपियन युनियन, फ्रान्स, जर्मनी, जपान, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया
उदयोन्मुख अर्थव्यवस्था असलेले देश चीन, कॅनडा, भारत, ब्राझील, रशिया, अर्जेंटिना, इंडोनेशिया, इटली, दक्षिण
कोरिया, मेक्सिको, सौदी अरेबिया आणि तुर्कस्तान
No comments:
Post a Comment