Tuesday, 17 November 2015

'एनएससीएन-के' दहशतवादी संघटना

नॅशनल सोशलिस्ट कौन्सिल ऑफ नागालॅंड-खापलांग (एनएससीएन-के) या संघटनेला केंद्राने दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केले आहे.
अवैध कारवाया (नियंत्रण) कायदा १९६७ (Unlawful Activities (Prevention) Act, 1967) नुसार केंद्रीय गृहमंत्रालयाने अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार "एनएससीएन-के‘ व त्याच्या अखत्यारीतील सर्व संघटनांवर बंदी घालण्यात आल्याची माहिती गृहमंत्रालयाच्या प्रवक्‍त्याने दिली. 
एनएससीएन-के
  • नॅशनल सोशलिस्ट कौन्सिल ऑफ नागालॅंड-खापलांग (एनएससीएन-के) के. एस. खापलांग  यांच्या नेतृत्वाखाली १९८८ मध्ये अस्तित्वात आली.
  • ईशान्य भारत आणि म्यानमार मधील नागा लोक वास्तव्य करीत असलेल्या सर्व भूभागाचे एकत्रीकरण करून नागलीम नावाचे सार्वभौम राज्य स्थापन करण्याचा उद्देश आहे.
  • भारताच्या सुरक्षा दलांवर "एनएससीएन-के‘ गटाने मणिपूरमध्ये अनेकदा हल्ले केले आहेत. मणिपूरच्या चंडेल जिल्ह्यात सैन्याच्या ताफ्यावर चार जून रोजी हल्ला करण्यात आला होता. मणिपूरमधील १८ जवानांच्या हत्येमागे या संघटनेचा हात असल्याचे निष्पन्न झाले होते. 
  • ईशान्येकडील इतर काही गटांशी हातमिळवणी करून "एनएससीएन-के‘ने "युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ साउथ ईस्ट एशिया‘ या नावाखाली एकत्र येऊन अनेक दहशतवादी कारवाया केल्या आहेत.
  • "एनएससीएन-के‘ने २००१ मध्ये शांतता व शस्त्रसंधी करारावर स्वाक्षरी केली होती. त्यानंतर यावर्षी मार्चमध्ये ते या शस्त्रसंधी करारापासून एकतर्फी मागे हटले.

Sources- Sakal, Wikipedia

No comments:

Post a Comment

Team MPSC Insights