Sunday, 1 November 2015

नवे नागरी हवाई धोरण मसुदा

नागरी विमान उड्डाण मंत्रालयाने नव्या  नागरी हवाई धोरणाचा मसुदा प्रसिद्ध केला आहे.

मसुद्यातील ठळक मुद्दे
  • विमान वाहतूक सेवा सर्वसामान्य व सर्वसमावेशक होण्यासाठी विभागीय संपर्क योजने (Regional Connectivity Scheme: RCS) अंतर्गत केंद्र सरकारने RCS मार्गांवर एक तास उड्डाण असणाऱ्या  मार्गांवर प्रवासी भाडे  रुपये २५००पेक्षा जास्त आकारता येणार नाही. १ एप्रिल २०१६ पासून ही योजना  अंमलात येईल.
  • देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय प्रवास तिकीट दरांवर २ टक्के अतिरिक्त कर लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • विमान वाहतूक क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणूक मर्यादा(FDI limit)  किरकोळ वाढवत आधीच्या ४९% वरून  ५० टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आली आहे.
  • विमान देखभाल, दुरुस्तीवर शून्य टक्के सेवा कर; इंधन दरातही सवलत देण्याचा विचार या मसुद्यांतर्गत मांडण्यात आलेला आहे.

No comments:

Post a Comment

Team MPSC Insights