पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी दिवाळीच्या आधी सुवर्ण बचत ठेव, सुवर्ण रोखे, सुवर्ण
नाणे आणि बुलियन अशा तीन सुवर्णमय योजनांचा शुभारंभ केला.
सुवर्ण नाणे आणि मुद्रा
- भारतीय बनावटीची सोन्याच्या शुद्धतेबाबत प्रमाणित
सुवर्ण नाणी आणि मुद्रा प्रथमच सादर करण्यात आली आहेत.
- सुवर्ण नाणे हे राष्ट्रीय चिन्ह अशोक
चक्र कोरलेले भारतातील पहिले राष्ट्रीय सोन्याचे नाणे आहे.
- ५ व १० ग्रॅम वजनाची
ही नाणी असून लवकरच २० ग्रॅममध्येही ती उपलब्ध होतील.
- भारतात तयार करण्यात आलेल्या
या सुवर्ण नाण्यांवर एका बाजूला अशोकचक्र तर दुसऱ्या
बाजूला महात्मा गांधी यांचे चित्र असेल.
- सुरुवातीला १५०००, ५ ग्रॅमची नाणी,
२००००, १० ग्रॅमची नाणी तसेच ३७५०, २० ग्रॅमची बुलियन (bullions) एमएमटीसीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जातील.
No comments:
Post a Comment