Monday, 23 November 2015

सातवा वेतन आयोग

न्यायमूर्ती अशोक कुमार माथूर यांच्या अध्यक्षतेखालील सातव्या वेतन आयोगाने, केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडे आपला अहवाल सादर केला आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाने या शिफारसी स्वीकारल्यानंतर १ जानेवारी २०१६ पासून केंद्र सरकारमधील कर्मचारी व निवृत्तिवेतन धारक यांच्या वेतनात वाढ होणार आहे. 

मुख्य शिफारसी:
  • सरकारी कर्मचाऱ्यांसाठी वेतन, भत्ते आणि पेन्शन मध्ये एकूण २३.५५%  वाढ. 
  • मूळ वेतनात (basic) १६% ची वाढ सुचवण्यात आली आहे.
  • किमान प्रति महिना १८००० रुपये  वेतनाची शिफारस
  • उच्च पदांसाठी कमाल वेतन २,२५,००० रुपये प्रति महिना आणि कॅबिनेट सचिव आणि इतर   २,५०,०००  यांना रुपये प्रति महिना म्हणून शिफारस केली आहे.
  • वार्षिक दर वाढ  ३% या दराने कायम ठेवण्यात आली आहे.
  • सशस्त्र दलांच्या एक श्रेणी एक पेन्शन (One Rank One Pension) प्रमाणेच इतर सरकारी कर्मचार्यांसाठीही अशा प्रकारची शिफारस
  • केंद्र सरकारच्या  कर्मचाऱ्यांच्या  निवृत्ती वयात कुठलाही बदल नाही. सध्या केंद्र सरकारच्या कर्मचारी निवृत्तीचे वय ६० वर्षे आहे.

 
 

No comments:

Post a Comment

Team MPSC Insights