अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी ब्लॉगच्या माध्यमातून
लोकांना जागे करण्याचे काम करणारे मानवी हक्क चळवळीतील कार्यकर्ते आणि लेखक रैफ
बदावी यांना युरोपीय संसदेने साखारोव्ह मानवतावादी पुरस्कार जाहीर केला आहे.
रैफ बदावी
- सौदी अरेबियाचे ब्लॉगर रैफ बदावी यांनी तेथील धर्मसत्तेला आव्हान दिले होते.
- ते सौदी अरेबियाचे लेखक, मानवी हक्क कार्यकर्ते व फ्री सौदी लिबरल्स या संकेतस्थळाचे जनक आहेत.
- राजकीय आणि धार्मिक विषयांवर वादविवादसाठी त्यांनी हा एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म सुरु केला होता.
- २०१२ मध्ये धार्मिक श्रद्धांचा अवमान, इलेक्ट्रॉनिक वाहिन्यांवर इस्लामचा अपमान असे अनेक आरोप ठेवून तुरुंगात टाकण्यात आले. सात वष्रे तुरुंगवास, ६०० फटके व दंड अशी शिक्षाही सुनावण्यात आली.
- आंतरराष्ट्रीय समुदायाकडून वारंवार मागणी होऊनही त्यांची सुटका झालेली नाही.
- सोव्हिएत महासंघातील बंडखोर शास्त्रज्ञ आंद्रे साखरोव्ह यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ युरोपीयन संसदेतर्फे हा पुरस्कार दिला जातो.
- मानवतावादी कार्य आणि मूलभूत स्वातंत्र्याचा लढा उभारणाऱ्या व्यक्तींना दिला जातो.
- आंद्रे साखारोव्ह हे रशियाच्या हायड्रोजन बॉम्बचे जनक होते व नंतर ते मानवी हक्क कार्यकत्रे बनले.
- आण्विक शस्त्रास्त्र स्पर्धेचे मानवजातीला असलेले संभाव्य धोके लक्षात आल्यामुळे त्या संबंधात जागृतीसाठी प्रयत्न केला.
- भौतिक शास्त्राचे शास्त्रज्ञ असणाऱ्या आंद्रे साखरोव्ह यांना १९७५ मध्ये नोबेल शांती पुरस्काराने गौरवण्यात आले.
No comments:
Post a Comment